शहरातील डोंगरगाव रस्त्यालगत असलेल्या शिवसेना कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्याचे तर नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नगरपालिका चौकात गरजूंना अन्नदान करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, पालिकेचे गटप्रमुख प्रा. मकरंद पाटील, जि.प.चे कृषी सभापती अभिजित पाटील, नगरसेवक संजय साठे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, संजय चौधरी, शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक मकरंदे, नगरसेवक चंद्रकांत रामदास पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सखाराम मोते, शहरप्रमुख रोहन माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक मिलिंद पाटील, राजेंद्र वाघ, सुरेंद्र कुवर, चंद्रभान पाटील, तुषार पाटील, माजी नगरसेवक मुकेश चौधरी, विनोद चौधरी, यशवंत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सखाराम भिल, रमण जावरे, पांडुरंग मराठे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन मधुकर मिस्री यांनी केले. कार्यक्रमासाठी बापू चौधरी, सागर पाटील, इद्रिस मेमन, दिलीप पाटील, राहुल चौधरी, प्रवीण सैंदाणे, उत्तम पाटील, सोमेश्वर सोनार, मनोज सोनार, निलेश पाटील, सागर चौधरी, प्रकाश तिरमले, गणेश चित्रकथे, प्रशांत नायक, विवेक भावसार यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.