लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:11 IST2021-08-02T04:11:44+5:302021-08-02T04:11:44+5:30
त आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य मुकेश पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्ही.डी. पाटील उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक ...

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन
त आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य मुकेश पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्ही.डी. पाटील उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर प्राचार्य मुकेश पाटील यांनी लोकमान्य टिळक व शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी उपशिक्षक व्ही. एस. पाटील, एस. एन. पाटील, एम. बी. पाटील, एस.पी. ओगले, प्राथमिकचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील, सविता पाटील, ज्योत्स्ना पाटील, सुनंदा पाटील तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन उपशिक्षक एस.व्ही. विसपुते यांनी केले. आभार प्राध्यापक भरत चव्हाण यांनी मानले.
ग्रामपंचायत, जयनगर
जयनगर, ता. शहादा येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०० वी पुण्यतिथी ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रारंभी सरपंच मीनाबाई सोनवणे व उपसरपंच सुनील माळी यांच्या हस्ते टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सरपंच प्रतिनिधी अंकुश सोनवणे, कोतवाल दयाराम सोनवणे, संगणक ऑपरेटर प्रकाश राठोड, महेंद्र शिंपी, संजय पाटील, कांतीलाल माळी, ग्रामपंचायत शिपाई रोहिदास सोनवणे, काशीनाथ पाटील उपस्थित होते.
देवमोगरा विद्यालय, वसलाई
नंदुरबार तालुक्यातील वसलाई येथील देवमोगरा माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हेमंत खैरनार होते. त्यांनी लोकमान्य टिळकांचे बालपण, सामाजिक कार्य याविषयी मार्गदर्शन केले. विद्यालयातील उपशिक्षक प्रमोद सोनार यांनी टिळकांचे राजकीय कार्य विशद केले व संजय दातीर यांनी टिळकांचे स्वातंत्रप्राप्तीसाठीचे प्रयत्न व झालेला तुरुंगवास याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला हिरालाल लिंगायत, दिलीप वळवी, सुनील वळवी, सुदाम गोराणे, टिकाराम पाडवी, मनेश वसावे, शैलेंद्र वळवी उपस्थित होते. सूत्रसंचालन हेमंत पाडवी यांनी केले. आभार कारभारी पाटील यांनी मानले.
वल्लभ विद्यामंदिर, म्हसावद
म्हसावद, ता. शहादा येथील वल्लभ विद्यामंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी मुख्याध्यापक विजय पाटील यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार अंमलात आणण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला पर्यवेक्षक अंबालाल चौधरी, ज्येष्ठ शिक्षक विश्राम पाटील, चतुर पाटील, गणेश पाटील, मल्हारराव ठाकरे, तुषार पाटील, आदर्श प्राथमिक शाळेचे योगेश सोनार, शिक्षकेतर कर्मचारी रामसिंग पाडवी, विनोद गोसावी, जितेंद्र पाटील, वैभव पाटील उपस्थित होते.