शिक्षकांप्रति कृतज्ञता सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:52+5:302021-09-06T04:34:52+5:30
जिल्ह्यात कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमात अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात निष्ठेने व निःस्वार्थपणे अध्यपनाचे काम करण्याऱ्या ...

शिक्षकांप्रति कृतज्ञता सोहळा
जिल्ह्यात कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमात अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात निष्ठेने व निःस्वार्थपणे अध्यपनाचे काम करण्याऱ्या नंदुरबार येथील राजे शिवाजी विद्यालयाचे शिक्षक जसवंत भगवान पवार यांना भाजप शिक्षक सेल नंदुरबार यांच्यावतीने २०२१ चा आदर्श शिक्षक पुरष्कार व रोटरी क्लब नंदुरबार यांच्यावतीने विद्यासागर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील यांना २०२१ चा आदर्श शिक्षक पुरष्कार प्रदान करण्यात आला.
दोघा शिक्षकांचा युवराज पाटील यांनी सत्कार केला. या वेळी राजे शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी आदर्श शिक्षकांचा गौरव केला.
अटलबिहारी वाजपेयी वाचनालय, शहादा
भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती दिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानी कुलकर्णी यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी वाचनालयाचे उपाध्यक्ष शिवपाल जांगिड, सचिव प्रा.संपत कोठारी, के.के. सोनार, चतुर पाटील, प्रमोद मोरे आदी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
एस.ए.मिशन शाळा, मलोणी
मलोणी, ता.शहादा येथील एस.ए. मिशन माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
प्रारंभी मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज यांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. या वेळी मुख्याध्यापक राजभोज यांनी सांगितले की, समाज व भावी नागरिक घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. तसेच समाजात शिक्षकाचे स्थान खूप मोठे आहे. आपल्यावर पालकांनी खूप मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरले पाहिजे. याप्रसंगी उषा जाधव, मंगला पाटील, भारती शेवाळे, कुणाल सोमवंशी, सोनाली पाकळे, नितीन गलराह, अजय गोडबोले आदी उपस्थित होते.
शेठ व्ही.के.शाह विद्यामंदिर, शहादा
शहादा येथील शेठ व्ही.के. शाह विद्यामंदिर व जी.एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य आय. डी. पटे , उपप्राचार्य एस.जे. पटेल व सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.