आजीच्या ताब्यातील नातू सून जबरीने घेवून गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 12:11 IST2019-06-15T12:11:24+5:302019-06-15T12:11:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सून व सुनेकडील मंडळींनी पोलीस असल्याची बतावणी करीत सासूला धक्काबुकी व शिविगाळ करीत त्यांच्या ...

आजीच्या ताब्यातील नातू सून जबरीने घेवून गेली
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सून व सुनेकडील मंडळींनी पोलीस असल्याची बतावणी करीत सासूला धक्काबुकी व शिविगाळ करीत त्यांच्या ताब्यातील नातूला जबरीने घेवून गेल्याची घटना नवापुरातील जनतापार्क भागात घडली. याप्रकरणी औरंगाबाद येथील आठ ते नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूरातील जनता पार्कमध्ये राहणा:या सुरेखा भिमराव बनसोडे यांच्याकडे त्यांचा नातू राहत होता. सून पल्लवी या औरंगाबाद येथे राहतात. मुलगा मिळावा म्हणून सून पल्लवी यांनी प्रय} सुरू ठेवला होता. 27 मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सून व तिच्या नातेवाईकांनी सुरेखा बनसोडे यांच्याकडे दोन वाहनांनी (क्रमांक एमएच 20-ईव्ही 3555 व एमएच 20 ईजे 9556) आले. सुनेच्या नातेवाईकांनी आपण पोलीस असल्याचे सांगत तुमच्यावर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. व घरात घुसू नातूला घेवून जाण्याचा प्रय} केला. त्यावेळी सुरेखा बनसोडे यांनी वाहनांसमोर आडवे होऊन नातूला घेवून जाण्यास विरोध केला असता त्यांना धक्काबुकी करून आणि शिविगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली व नातूला घेवून गेल्याचे बनसोडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सून पल्लवी, तिचे आई व वडील आणि इतर पाच ते सहा नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार नगराळे करीत आहे.