मोलगी येथे ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:24+5:302021-08-23T04:32:24+5:30

अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे २० ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मोलगी उखल्लीपाडा येथील २०१० पासूनचे सर्वच एकूण ...

Gram Sabha at Molgi | मोलगी येथे ग्रामसभा

मोलगी येथे ग्रामसभा

अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे २० ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मोलगी उखल्लीपाडा येथील २०१० पासूनचे सर्वच एकूण ४५ प्रलंबित वनदावे आणि ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या आठवी ते बारावीच्या विद्यार्थांच्या पालकांना शाळा सुरू करण्याबाबत शासन परिपत्रकाचे वाचन करून माहिती देण्यात आली. ग्रामसभेत वनसमितीचे अध्यक्ष व सचिव यांना १०-१२ वर्षात वनदावे का मंजूर झाले नाहीत, अशी विचारणा करण्यात आली. पुढील दिवसात काही त्रुटी राहिल्या असतील त्या पूर्ण करून लवकरात लवकर वनदावे मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन वन अध्यक्ष वाड्या गिंब्या वसावे यांनी दिल्याने ग्रामसभेत लवकरात लवकर वनदावे मंजूर करणे, मोलगी ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामसभेत सरपंच मनोज तडवी, ग्रामविकास अधिकारी गुलाब धनगर, तलाठी, उपसरपंच कृष्णा वसावे, पोलीस पाटील रतासिंग वसावे, ग्रा.पं. सदस्य जयसिंग तडवी, किरण वसावे, माजी सरपंच यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेत सॅनिटायझरचा वापर करीत सर्वांनी तोंडाला मास्क लावले होते.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी १४ ऑगस्ट रोजी आदेश केल्याप्रमाणे ग्रामसभा रद्द केल्या होत्या आणि आवश्यकता असल्यास ऑनलाइन ग्रामसभा घ्यावी अशा सूचना केल्या होत्या. परंतु मोलगीसारख्या दुर्गम भागात रेंज तसेच कनेक्टिव्हिटी नसल्याने या भागात ऑनलाइन ग्रामसभा घेणे शक्य नव्हते. तसेच ग्रामसभा घेणे अत्यंत गरजेचे असल्याने ही ग्रामसभा घेण्यात आली.

Web Title: Gram Sabha at Molgi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.