ग्रामपंचायत निवडणूकीस मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 13:10 IST2020-03-14T13:10:04+5:302020-03-14T13:10:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चार तालुक्यात ३८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे़ निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना जात ...

ग्रामपंचायत निवडणूकीस मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील चार तालुक्यात ३८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे़ निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आल्याने आठ दिवसांपासून त्यांची तारंबळ उडाली होती़ हा निर्णय गुरुवारी शासनाने मागे घेतला असून निवडणूकीत अर्ज भरण्याची मुदतही वाढवली आहे़ नवीन वेळापत्रकानुसार १६ मार्च पर्यंत मुदत वाढली आहे़
सहा मार्चपासून जिल्ह्यातील शहादा, तळोदा, धडगाव आणि नवापुर या चार तालुक्यात निवडणूक कार्यक्रमांतर्गत अर्ज भरणाऱ्यांची धावपळ सुरु होती़ यातही शासनाने गेल्यावर्षी घेतलेल्या निर्णयानुसार जात पडताळणी प्रमाणपत्राची सक्ती करुन प्रस्तावांचे टोकन घेण्यास नकार दिला होता़ यामुळे इच्छुकांकडून नाराजी व्यक्त होत होती़ यामुळे चारही तालुका मुख्यालयी तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक कक्षातही शुकशुकाट होता़ गुरुवारी सायंकाळपर्यंत नवापुर तालुक्यात १०९ तर शहादा तालुक्यात केवळ १० जणांचे अर्ज आले होते़ उर्वरित दोन तालुक्यात कागदपत्रांसाठी धावपळ सुरु होती़ परंतू गुरुवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्रासोबत जातपडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोचपावती व हमीपत्र सादर करण्यास मान्यता देत तसे आदेश त्या-त्या जिल्हा प्रशासनाकडे पाठवले होते़ यातून इच्छुकांना दिलासा मिळाला असून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला़ आयोगाने सुधारीत निवडणूक कार्यक्रमाचीही घोषणा केली आहे़यापूर्वी घोषित करण्यात आलेली १३ मार्चपर्यंतच्या अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे़