यात्रेला जाणाऱ्यांना ग्रामपंचायतीने रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 01:01 PM2020-03-22T13:01:33+5:302020-03-22T13:01:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवस फेडण्यासाठी देवमोगरा (गुजरात) यात्रेला निघालेल्या लहान कडवान ता. नवापूर येथील भाविकांना तेथील सरपंचने ...

Gram Panchayat barred pilgrims | यात्रेला जाणाऱ्यांना ग्रामपंचायतीने रोखले

यात्रेला जाणाऱ्यांना ग्रामपंचायतीने रोखले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवस फेडण्यासाठी देवमोगरा (गुजरात) यात्रेला निघालेल्या लहान कडवान ता. नवापूर येथील भाविकांना तेथील सरपंचने रोखले. या भाविकांच्या कोरोना व्हायरसची वाढती तिव्रता लक्षात आणून देत देवमोगरा येथील याहा मोगी माता मंदिरात प्रवेश बंद करण्यात आल्याची माहिती देखील दिली.
देशात करोना विषाणूच्या वेगाने होणारा प्राद्रुर्भाव थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासन वेळोवेळी महत्वाचे निर्णय घेत आहे. त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू करून जमावबंदी लागू केली आहे. असे असतांनाच लहान कडवान येथील ईश्वर गावीत व सुनील गावीत यांनी आदिवासी कुलदेवी याहा मोगी मातेची मानता पाळली होती. याचा नवस फेडण्यासाठी देवमोगरा ता. सागबारा येथील मंदिरात जाण्यासाठी त्यांनी कुटुंबियांसह आप्त व ग्रामस्थांचा मोठा फौजफाटा देखील तयार केला होता. सर्व
तेथील आदिवासी समाजबांधव देवमोगराकडे जाण्याची तयारी करत होते, याची माहिती कडवान येथील सरपंच गोविंद गावीत यांना मिळाली. सरपंच गावीत यांनी तातळीने यात्रेकरुंच्या घराकडे धाव घेत त्यांची बैठक घेतली. दरम्यान तयारी करणाºया भाविकांना कोरोना आजाराची माहिती दिली. त्यात करोना साथीमुळे बाहेरगावी न जाण्याबाबत समजावून सांगितले. शिवाय सर्व ग्रामस्थांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करून गावांत बाहेरून येणाºया लोकांची माहिती वेळीच प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले.
करोना विषाणूंपासून प्रतिबंध करण्यासाठी हाथ धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. सर्व गावकऱ्यांनी करोना विषाणूशी लढण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे ठरविण्यात आले. त्यामुळे या भाविकांमध्ये कोरोनाबाबत अधिक जनजागृती देखील करण्यात आली. यावेळी उपसरपंच वंदना सुभाष पाडवी, पोलीस पाटील विनायक रेसा गावित, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुभाष पाडवी, ग्रामसेवक अर्चना वसावे इत्यादी उपस्थित होते.

Web Title: Gram Panchayat barred pilgrims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.