नंदुरबार बाजार समितीत हमीभावासाठी धान्याची गुणवत्ता चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:46 IST2018-04-13T12:46:35+5:302018-04-13T12:46:35+5:30

Grain quality test for warranted in Nandurbar market committee | नंदुरबार बाजार समितीत हमीभावासाठी धान्याची गुणवत्ता चाचणी

नंदुरबार बाजार समितीत हमीभावासाठी धान्याची गुणवत्ता चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार बाजार समितीत धान्य खरेदीसाठी तीन अधिका:यांची समिती स्थापन करून या समितीमार्फत धान्याची गुणवत्ता चाचणी करून प्रमाणित धान्य हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय नंदुरबार बाजार समितीने घेतला आहे. तर जे धान्य गुणवत्ता चाचणीत बसणार नाही असे धान्य शेतक:यांच्या संमतीने खुल्या बाजारात त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे.
बाजार समित्यांमध्ये हमीभावाने धान्यमाल खरेदी करावा अन्यथा संबंधित व्यापा:यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे. यासंदर्भात शहाद्यातील आंदोलनानुसार तेथील आठ व्यापा:यांचे परवानेही रद्द केले    आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. काही ठिकाणी बाजार समितीचे व्यवहार   बंद केले आहेत तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर कायदेशीर मार्ग शोधण्याचे पर्याय सुरू झाले      आहेत.
या पाश्र्वभूमीवर नंदुरबार बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत रहावे यासाठी मार्गदर्शनासाठी येथील व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी किशोरभाई वाणी, किर्तीभाई शहा, गिरीश जैन, पिंटू जयस्वाल व अमीत जैन या शिष्टमंडळाने जिल्हा सहायक उपनिबंधक एस.वाय. पुरी यांची भेट घेतली. त्यांच्यातील चर्चेनुसार कायदेशीर पर्याय शोधण्यात आला. पणन विभागाच्या कक्षाधिका:यांच्या आदेशानुसार बाजार समितीत धान्य माल प्रमाणित करून घेण्यासाठी कृषी अधिकारी, तालुका उपनिबंधक व बाजार समितीचे ग्रेडर यांची समिती स्थापावी. ही समिती राज्य शासनाने हमी भावाने धान्य खरेदीसाठी त्याचे   जे निकष सांगितले आहेत त्या निकषात धान्याची गुणवत्ता बसते का? ते तपासून प्रमाणित करावे. हे प्रमाणित धान्य व्यापा:यांनी हमीभावाने खरेदी करावे असा निर्णय झाला. 
याशिवाय जे धान्य प्रमाणित होणार नाही ते धान्य  शेतक:यांच्या संमतीनुसार बाजार समितीत खुल्या लिलावाने विक्री करावे.
सध्या बाजार समितीत गहू, हरभरा आणि मकाची मोठी आवक सुरू आहे. त्यामुळे धान्य खरेदीबाबत व्यापा:यांनी भूमिका घेतली. आता याबाबत शेतकरी काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे. 
शहादा बाजार समितीचे व्यापा:यांचे परवाने रद्द झाल्याने येथील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला आहे. बाजार समितीने व्यापा:यांना परवान्यासाठी आवाहन केले आहे. पहिल्या दिवशी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हे परवाने देण्याची प्रक्रिया कितीही गतीमान झाली तरी किमान आठवडाभर ती रुळावर येणार नाही. त्यामुळे शहादा बाजार समितीतील व्यवहार हा आठवडा ठप्पच राहील, असे चित्र आहे. दुसरीकडे गुरुवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळासह कुठे कमी पाऊस झाला तर कुठे गारा पडल्या. अशा स्थितीत बहुतांश शेतक:यांची धांदल उडाली. अनेक शेतक:यांनी गहू हाव्रेस्टरने काढून शेतातूनच परस्पर बाजार समितीत विक्रीसाठी न्यावा असे नियोजन केले आहे. परंतु सध्याच्या हवामानामुळे शेतकरी चलबिचल झाला असून तातडीने शेतातून गहू-हरभरा काढला तरी त्याला घरात ठेवायला जागा नाही आणि दुसरीकडे विक्रीसाठी बाजार समिती बंद अशी स्थिती आहे. सध्या लगAसराईचा हंगाम आहे, खरीप हंगामाचीही तयारी सुरू करायची आहे, पपई, केळी, ऊस मशागतीची कामे करायची आहेत त्यामुळे हाती पैसा आवश्यक आहे. पण बाजार समिती बंद झाल्याने अर्थकारण ठप्प आहे. त्यामुळे शेतक:यांची चिंता अजूनच वाढली आहे.
 

Web Title: Grain quality test for warranted in Nandurbar market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.