ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्यास परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST2021-04-01T04:31:08+5:302021-04-01T04:31:08+5:30
शहादा : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्याची ...

ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्यास परवानगी द्यावी
शहादा : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शहादा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेमार्फत करण्यात आली आहे.
या संघटनेमार्फत तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मार्च महिन्यात शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी रुग्ण मयत झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा परिस्थितीत स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरीत करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष अरविंद कुवर, ज्ञानेश्वर चौधरी, राजू बच्छाव यांच्यासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या स्वाक्षर्या आहेत.