पदवीधर विकास महामंडळ स्थापन होणार राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या प्रदेशाध्यक्षांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:53+5:302021-08-23T04:32:53+5:30

यावेळी पाटील पुढे म्हणाले की, राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार आहे. पदवीधरांसाठी गेल्या तीन वर्षांपासून काम ...

Graduate Development Corporation will be established | पदवीधर विकास महामंडळ स्थापन होणार राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या प्रदेशाध्यक्षांची माहिती

पदवीधर विकास महामंडळ स्थापन होणार राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या प्रदेशाध्यक्षांची माहिती

यावेळी पाटील पुढे म्हणाले की, राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार आहे. पदवीधरांसाठी गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहे. तरुणांच्या कल्याणासाठी पदवीधर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा मुद्दा राष्ट्रवादी पदवीधर संघाने हाती घेतला आहे. हे महामंडळ स्थापन करण्यास सरकार तयार असून, मंत्र्यांनी त्यास हिरवा कंदील दाखवला आहे, तसेच प्रदेश उपाध्यक्ष शेषराव भोसले म्हणाले राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या माध्यमातून पदवीधारकांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार झाले आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ याप्रमाणे पदवीधारकांसाठी पदवीधर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. यानंतर नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेश पाटील म्हणाले की, देशाचे भवितव्य हा युवक घडवतो. त्यामुळे युवकांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस विशाल सूर्यवंशी, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संतोष मेंगडे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्रसिंग राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, जितेंद्र कोकणी, सीताराम पावरा, बबलू कदमबांडे, माधव पाटील, सुरेंद्र कुवर, महेंद्र कुवर, पंकज पाटील, राज ठाकरे, लल्ला मराठे, सुरेश वळवी, नीलेश ठाकरे, नीलेश चौधरी, रूपेश जगताप, सागर कोळी, मिलिंद जाधव, हेमंत बिरारे आदी उपस्थित होते.

Web Title: Graduate Development Corporation will be established

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.