जि.प. निवडणुकीची शहरी भागात उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 13:00 IST2019-12-27T13:00:49+5:302019-12-27T13:00:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा ज्वर ग्रामिण भागात असला तरी शहरी भागात देखील ...

 GP Election in urban areas | जि.प. निवडणुकीची शहरी भागात उत्सुकता

जि.प. निवडणुकीची शहरी भागात उत्सुकता

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा ज्वर ग्रामिण भागात असला तरी शहरी भागात देखील त्याची मोठी उत्सूकता लागून आहे. शहरी भागातील नातेवाईक, आप्तेष्ठ निवडणुकांची वेळोवेळी माहिती घेत असल्याचे चित्र आहे.
जि.प. व पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. छाननीनंतर बहुतेक ठिकाणच्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. माघारीअंती किती उमेदवार कुठल्या गटात, गणात आहेत हे स्पष्ट होणार आहे. असे असले तरी ग्रामिण भागात सध्या विविध घडामोडींना वेग आला आहे.
गावागावात बैठका जोर धरू लागल्या आहेत. नातेवाईक उमेदवारांना भेटण्यासाठी जात आहेत. ही बाब लक्षात घेता शहरी भागातील मतदारांना या निवडणुकींची मोठी उत्सूकता लागली आहे. दैनंदिन घडामोडी काय घडतात याकडे शहरवासी लक्ष देवून आहेत.
नंदुरबार शहराचा विचार करता शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. लगतच्या वस्ती या ग्रामिण भागात अर्थात पातोंडा, होळ, वाघोदा, करजकुपे, टोकरतलाव, दुधाळे, चौपाळे, भोणे या गावांच्या हद्दीमध्ये आहेत. ही गावे विविध गट व गणाअंतर्गत येतात. त्यामुळे या भागातील शहरवासी हे त्या ठिकाणचे मतदार देखील आहेत. त्यांचे मतदान देखील निर्णायक राहणार आहे. ही बाब लक्षात घेता शहरवासीयांमध्ये या निवडणुकीची उत्सूकता ताणली गेली आहे.
नंदुरबार शहरासह तळोदा, नवापूर, शहादा व धडगाव ही नगरपालिका व नगर पंचायतीअंतर्गत येतात. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रक्रियेत ही शहरे नाहीत परिणामी तेथील शहरवासीयांना निवडणुकीची उत्सूकता कायम आहे.

अनेक कुटूंब हे गावातून शहरात राहण्यासाठी आले आहेत. कुणी नोकरीनिमित्त तर कुणी मुलांच्या शिक्षणासाठी येथे आलेले आहेत. त्यामुळे शहरवासीयांना या निवडणुकीची मोठी उत्सूकता आहे. नातेवाईकांना याबाबत माहिती विचारली जात आहे. सध्या बऱ्याच शाळांना नाताळच्या सुट्टया असल्यामुळे अनेक कुटूंबे गावी गेलेली असून तेथे आपल्या नात्यातील उमेदवाराच्या प्रचारात ते गुंतले असल्याचे दिसून येत आहे.

Web Title:  GP Election in urban areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.