शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

राज्यपालांचा दौरा सातपुड्यासाठी फलदायी व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:22 PM

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्याच्या अतीदुर्गम भागात तीन वर्षात दुसऱ्यांदा महाराष्टÑाचे राज्यपाल येत असल्याने सातपुड्याच्या ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्याच्या अतीदुर्गम भागात तीन वर्षात दुसऱ्यांदा महाराष्टÑाचे राज्यपाल येत असल्याने सातपुड्याच्या डोंगरदºयात चैतन्याचे वातावरण आहे. खुद्द राज्यपाल दारी येत असल्याने आदिवासींच्या विकासाबाबतच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या असून हा दौरा तरी फलदायी व्हावा अशी अपेक्षा त्यांना लागून आहे.राज्यातील सर्वात अतीदुर्गम आणि मागास भाग म्हणून जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्याची ओळख आहे. या तालुक्याचा विकासाबाबत आजवर खूप चर्चा झाल्या, घोषणा झाल्या पण विकासाची गती मात्र वेग घेत नसल्याचे चित्र आहे. आजही वीज, रस्ते आणि पाणी नसलेले सर्वाधिक गावे याच तालुक्यात आहेत. रोजगार, शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न तर येथील जनतेच्या पाचवीलाच पुजले आहेत. अशा स्थितीत एखाद्या बड्या नेत्याचा दौरा या भागात लागला की येथील जतनेच्या आशा, आकांक्षांना पालवी येते. असेच काहीसे चित्र राज्यपालांच्या दौºयाबाबत लागून आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे गुरुवार, २० रोजी मोलगी, ता.अक्कलकुवा येथे मुक्कामी येत आहेत. दिवसभरात ते या भागातील विकास कामांची पहाणी, आदिवासींच्या प्रश्नांबाबत चर्चा करणार आहेत. या पूर्वी देखील तीन वर्षांपूर्वी तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव हे मोलगी व मोलगीपासून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या पिंपळखुटा, ता.अक्कलकुवा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आदिवासींचे प्रश्न कार्यकर्त्यांकडून जाणून घेतले. त्यांच्या समोर कार्यकर्त्यांनी वनहक्क अंमलबजावणीतील संथगती, वनगावांचे प्रश्न, रोजगार, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, वीज, पाणी, सिंचनसुविधा याबाबतचे विविध प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर तत्कालीन राज्यपाल राव हे आदिवासींचे प्रश्न ऐकुण खूप भावूक झाले आणि या भागातील आदिवासींसाठी राजभवनाचे द्वारे २४ तास खुले राहतील अशी ग्वाही देत मोलगी स्वतंत्र तालुक्याची निर्मितीचा प्रश्नावर गांभिर्याने विचार करण्याचे सांगितले होते. त्यानंतर मात्र काही दिवस प्रशासनाने या भागावर लक्ष केंद्रीत केले. पुन्हा जैसे थे स्थिती झाली. याच भागातील भगदरी, ता.अक्कलकुवा हे गाव राज्यपाल दत्तक गाव म्हणून जाहीर झाले. तेथे प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले. त्या ठिकाणीही मध्यंतरी राज्यपाल येणार असल्याबाबत दोन वेळा दौरे देखील जाहीर झाले होते. परंतु काही कारणास्तव ते दौरे रद्द झाले. पण भगदरीतील विकास कामे आणि त्यातील भ्रष्टाचाराची चर्चा मात्र चर्चेत राहिली. या ठिकाणी कृषी व वन विभागाने केलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यावेळी यासंदर्भात चौकशीच्या मागण्या झाल्या पण त्याकडे गांभिर्याने लक्ष घातले गेले नाही. किमान राज्यपालांचा उद्याच्या दौºयानिमित्ताने प्रशासन हा विषय गांभिर्याने घेईल अशी अपेक्षा आहे.या दौºयानिमित्ताने आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी व त्यांना स्थानिक स्तरावर रोजगार देण्यासाठी, रस्ते नसलेल्या ३०० पेक्षा अधीक लोकसंख्येच्या गावांना रस्त्याने जोडण्यासाठी व वीज नसलेल्या गावांना वीज पोहचविण्यासाठी चर्चा होईल. सिकलसेल, कुपोषणासंदर्भातही चर्चा होतील. वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात सुरू असलेली दिरंगाईचे प्रश्न उपस्थित होतील. मोलगी तालुका निर्मिती तसेच तेथे विविध कार्यालये सुरू करण्याबाबत देखील उहापोह होईल. अर्थात राज्यपालांच्या या दौºया निमित्ताने जुन्याच प्रश्नांची पुन्हा उकल होईल पण, राज्यपाल महोदय या वेळी तरी हे प्रश्न अधीक गांभिर्याने घेतील व प्रशासन आणि सरकारला खडसावून ते प्रश्न सोडविण्याबाबत आदेश देतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौरा निमित्ताने मोलगी आणि भगदरी येथील शासकीय इमारतींचे बाह्य रूप बदलले असून सर्व काही चकाचक झाले आहे. मोलगी येथील विश्राम गृह, ग्रामिण रुग्णालय, पोषण पुनर्वसन केंद्र, पशुसंवर्धन केंद्र, आश्रमशाळा आदी विविध इमारतींना रंगरंगोटी करून सज्ज ठेवण्यात आले आहे. या सज्जतेमुळे बाह्य विकासाचे प्रदर्शन झाले असले तरी अंतर्गत सुविधा व व्यवस्था मात्र नियमित आणि अखंडपणे आदिवासींच्या सेवेसाठी तत्पर करण्याची गरज आहे.