राज्यपालांनी दिला आदिवासींना उत्कर्षाचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 17:09 IST2020-02-20T17:08:42+5:302020-02-20T17:09:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मी देखील अतीदुर्गम डोंगराळ भागातून आलो आहे. आजही माङया गावाला जाण्यासाठी एक-दिड किलोमिटर पायी ...

Governor gives mantra of upliftment to tribals | राज्यपालांनी दिला आदिवासींना उत्कर्षाचा मंत्र

राज्यपालांनी दिला आदिवासींना उत्कर्षाचा मंत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मी देखील अतीदुर्गम डोंगराळ भागातून आलो आहे. आजही माङया गावाला जाण्यासाठी एक-दिड किलोमिटर पायी चालावे लागते. त्यामुळे तुमचे दु:ख आणि माङो दु:ख एक आहे या शब्दात आदिवासींची आपुलकी साधत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दु:खाचे रडगाणे करत बसण्यापेक्षा शिका, मेहनत घ्या, संघर्ष करा आणि जिद्दीने जिवनाचा उत्कर्ष साधा असा मंत्र त्यांनी यावेळी आदिवासींना दिला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गुरुवारी सातपुडय़ाच्या अतीदुर्गम भागातील मोलगी व भगदरी येथील दौ:यावर आहेत. नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे अगोदर सकाळी साडेनऊ च्या सुमारास त्यांचे हेलिकॉप्टर मोलगीला आले. तेथून शासकीय विश्रामगृहावर अधिका:यांशी चर्चा केल्यानंतर मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्राचे त्यांनी उद्घाटन केले. त्यानंतर तेथे दाखल बालकांची पहाणी करून त्यांच्या पाल्यांशी संवाद साधला. त्यानंतर ग्रामिण रुग्णालयाची पहाणी केली. तेथून थेट भगदरी येथील अंगणवाडी व लघु तलावाची पहाणी केली. त्याच ठिकाणी बांधण्यात आलेल्या आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उद्घाटनही त्यांनी केले. त्या ठिकाणी आदिवासीच्या सांस्कृतिक ठेव्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते त्याची पहाणी केली आणि तेथेच आदिवासींशी संवादही साधला. तत्पुर्वी आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी आदिवासी परंपरेनुसार त्यांना फेटा बांधून तसेच होळीतील प्रसिद्ध मोरखी टोप देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सिमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित आदिवासींनी वीज, पाणी, शिक्षण, रोजगार, आरोग्य, वनदावे, वनगावे आदी संदर्भातील प्रश्नांचा पाढा वाचला. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी विजेचा प्रश्न गांभिर्याने घेत संबधीत अधिका:यांच्या साक्षीने सहा महिन्यात 24 तास वीज पुरवठा करण्याबाबतच्या सुचना केल्या. 132 के.व्ही.चे केंद्र तात्काळ कार्यान्वीत करण्यासाठी मदतीची ग्वाही देतांना अधिका:यांनी जर मुदतीत काम पुर्ण केले नाही तर सहा महिन्यानंतर येथील आदिवासींसोबत आपणही या अधिका:यांना घेराव घालू असा मिश्कील टोलाही मारला. शासनाचा विविध योजनांचा लाभ लोकांर्पयत पोहचतो की नाही त्याचीही त्यांनी उपस्थितांकडून खातरजमा केली. विकासाचे काम सुरू राहील पण आपण आपली कामे व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत मेहनत घ्या, मुलांना शिकवा, चांगले संस्कार द्या ते निश्चितच उद्याचे राष्ट्रपती होतील असे स्वप्न दाखवत त्यांनी आदिवासींना धीर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. आकांक्षीत जिल्ह्यासाठी असलेला कार्यक्रम या भागात राबविला जाईल त्यामुळे विकासाला गती येईल असेही त्यांनी सांगितले. 


 

Web Title: Governor gives mantra of upliftment to tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.