शासनाने विद्यापीठातील हस्तक्षेप थांबवावा वर्ग तासिका त्वरित सुरू कराव्या; विद्यापीठ विकास मंचची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 15:36 IST2021-02-01T15:36:17+5:302021-02-01T15:36:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे कुलगुरू पी.पी. पाटील यांच्या शैक्षणिक दौरा ...

The government should stop interfering in the university and start the class immediately; Demand for University Development Forum | शासनाने विद्यापीठातील हस्तक्षेप थांबवावा वर्ग तासिका त्वरित सुरू कराव्या; विद्यापीठ विकास मंचची मागणी

शासनाने विद्यापीठातील हस्तक्षेप थांबवावा वर्ग तासिका त्वरित सुरू कराव्या; विद्यापीठ विकास मंचची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे कुलगुरू पी.पी. पाटील यांच्या शैक्षणिक दौरा असताना विद्यापीठ विकासमंचतर्फे विविध मागण्यांचे निवेदन दिले.
महाराष्ट्र शासनाने २०१६ विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमणूक करण्यात आली आहे. विद्यापीठ कायद्यात अनावश्यक बदल करून कामकाजामध्ये ढवळाढवळ करणे आणि राज्यपालांचे अधिकार कमी करून राजकीय हस्तक्षेप वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून शासनाने विद्यापीठाच्या कारभारातील राजकीय हस्तक्षेप थांबवावा व शैक्षणिक वर्ग तासिका सुरू कराव्या, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचतर्फे कुलगुरू पी.पी. पाटील यांना करण्यात येत आली आहे.
निवेदनात शासनाने मुंबई विद्यापीठात कुलसचिवांची नेमणूक करून विद्यापीठाच्या कामकाजात अवैधरित्या हस्तक्षेप करणाऱ्या सरकारला न्यायालयाने फटकारले असून शासनाने योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठांमध्ये चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत, मात्र प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ग तासिका अद्याप सुरू झालेले नाही, राज्यातील महाविद्यालय कधी सुरू होतील, विद्यार्थी प्रतीक्षेत असून राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू करण्यास शासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. कोरोना प्रतिबंधक नियमामुळे मार्च २०२० पासून विद्यापीठ व महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ग बंद असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू करण्यास शासनाची चालढकल सुरू असून ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा, शिक्षणाची परिणामकारकता इत्यादी बाबींकडे शासनाने दुर्लक्ष होत असून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळेतील विनाअडथळा विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. मात्र पदवी आणि पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत आहे. शासनाने त्वरित सर्व शैक्षणिक वर्ग सुरू करावे. अशी मागणीदेखील निवेदनाव्दारे विद्यापीठ विकास मंचने केलेली आहे. विद्यापीठ कायद्यात बदल करून आपला राजकीय हस्तक्षेप वाढविण्याचा प्रयत्न सरकारने त्वरित थांबवावा. विद्यापीठ व महाविद्यालय त्वरित सुरू करावे, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचतर्फे करण्यात आली आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यापीठ विकास मंचातर्फे यावेळी देण्यात आलेला आहे.
यावेळी विद्यापीठ विकास मंचचे शहादा तालुका प्रमुख गौरव पाटील, विद्यापीठ विकास मंचचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील, अधिसभा सदस्य डॉ.दिनेश खरात, नंदुरबार तालुका प्रमुख धर्मराज करंकाळ, तळोदा तालुका प्रमुख धनंजय पाटील, अक्कलकुवा तालुका प्रमुख कमलेश शिंदे, नवापूर तालुका प्रमुख संदीप शेगर, योगेश आहिरे, अक्षय तिरमले, कल्पेश ठाकरे, शांत नवले, गणेश सोनवणे, रोहित तिरमले, दिनेश पवार, गणेश सोनवणे, त्यागराज मराठे, धनंजय कटारे, प्रेम माळी, चेतन पाडवी, प्रेमकुमार सूर्यवंशी, प्रा.आर.डी. मोरे, संदीप वसावे, रवींद्र वसावे, अर्जुन वसावे, अविनाश वसावे, चंद्रसिंग वसावे, दिनेश वसावे, सुदाम वसावे, विश्वास पाडवी, दीपक पाडवी, मंगेश वळवी, अभाविप जिल्हा संयोजक नीलेश हिरे, जिल्ह्यासह संयोजक प्रीतम निकम, शुभम स्वामी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The government should stop interfering in the university and start the class immediately; Demand for University Development Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.