कुकडेल भागात एकावर गुप्तीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 12:36 IST2017-10-11T12:36:44+5:302017-10-11T12:36:44+5:30

उधारीच्या पैशांचा वाद : चौघांकडून बेदम मारहाण

Gopti War in Ekad, Kukdeel area | कुकडेल भागात एकावर गुप्तीने वार

कुकडेल भागात एकावर गुप्तीने वार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरातील कुकडेल भागात मंडपाचे पैसे देण्याघेण्याच्या वादातून चौघांनी एकास मारहाण करत गुप्तीने वार केल्याची घटना घडली़ रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती़ 
नंदुरबार शहरातील ईलाही चौक भागातील रहिवासी शोएब शाह मुश्ताक शाह हे समीर या मित्रासोबत रविवारी सायंकाळी शहादा येथे मोहसीन नामक व्यक्तीकडे  थकबाकी असलेले 18 हजार रूपये घेण्यासाठी गेले होत़े शहादा येथे गेल्यानंतर मोहसीन याने शोएब व समीर या दोघांना शहादा पालिकेजवळ कुकडेल रस्त्यावर बोलावले, याठिकाणी मोहसीन याने पैसे देण्यावरून हुज्जत घातल्याने वाद सुरू झाला़ दरम्यान मोहसीन, त्याचा लहान भाऊ, मोहसीन टेम्पोवाला आणि जमिल नामक एक अशा चौघांनी मिळून शोएब यास मारहाण करण्यास सुरूवात केली़ यावेळी जमिल आणि मोहसीन टेम्पोवाला या दोघांनी गुप्ती काढून शोएब याच्या पाठ, कंबर याच्यावर गंभीर वार केल़े यामुळे शोएब शाह हा जखमी झाला़ मारहाणीत शोएब शाह याच्या खिशातील पैसे काढून घेतल्याची माहिती देण्यात आली आह़े 
गंभीर जखमी झालेल्या शोएब यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े सोमवारी प्रकृती ठिक झाल्यानंतर त्यानी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबवरून गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

Web Title: Gopti War in Ekad, Kukdeel area