मावळते पदाधिकारी व सदस्यांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:38 IST2019-07-29T12:37:14+5:302019-07-29T12:38:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मावळत्या जिल्हा परिषदेच्या पदाधिका:यांचा सन्मान रविवारी अधिका:यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अधिकारी व पदाधिकारी ...

Goodbye to moving staff and members | मावळते पदाधिकारी व सदस्यांना निरोप

मावळते पदाधिकारी व सदस्यांना निरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मावळत्या जिल्हा परिषदेच्या पदाधिका:यांचा सन्मान रविवारी अधिका:यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अधिकारी व पदाधिकारी यांच्या समन्वयातून गेल्या पाच वर्षात विकासाची कामे करता आल्याची भावना यावेळी पदाधिका:यांनी व्यक्त केली. 
नंदुरबार येथील जिल्हा परीषदेतील याहामोगी सभागृहात माजी सदस्यांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात      आला. याप्रसंगी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी दिलीप चौधरी, सामान्य प्रशासनचे उपमुख्य   कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे, लघुसिंचनचे कार्यकारी अभियंता रविंद्र मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सारीका बारी, लेखाधिकारी शबाना शाह, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, पी.टी.बडगुजर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात माजी अध्यक्ष भरत गावीत, बांधकाम समितीचे माजी सभापती दत्तू चौरे, समाज कल्याण समितीचे माजी सभापती आत्माराम बागले, आरोग्य समितीच्या माजी सभापती हिराबाई पाडवी, नंदुरबार पंचायत समितीच्या माजी सभापती रजंना नाईक, तळोद्याचे माजी सभापती शांतीबाई पवार, नवापुरच्या माजी सभापती सविता गावीत, माजी सदस्य रामचंद्र पाटील, अंबरसिंग पाडवी, सुनील चव्हाण, डॉ.कुमूदिनी गावीत आदींच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी भरत गावीत यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले, जिल्हा झाल्यानंतर पहिल्यांदाच पदाधिका:यांचा सत्कार होत असल्याचे सांगितले. अडीच वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनेक चांगले अनुभव मिळाले. खुर्चीला न्याय देण्याचा व लोकांचे काम करण्याकडे लक्ष दिले. प्रत्येक कामात सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे चांगले सहकार्य लाभले. जिल्हयात अंसख्य प्रश्न आहेत ते सोडविण्याचा प्रय} होत आहेत. स्वच्छता अभियानात सर्वाना शौचालय व घरकुले देण्याचा प्रय} सभागृहाकडून झाला. कुपोषणमुक्तीसाठी सर्वानी एकत्र काम करण्याची गरज आहे. जि.प.ची रिक्तपदे भरण्यात यावीत तसेच सेसफंडाचे पारदर्शकपणे लोकांच्या गरजेप्रमाणे वाटप होवून त्यातून लोकांची कामे झाली पाहिजेत असेही सांगितले. 
सीईओ विनय गौडा यांनी पदाधिकां:यांच्या चांगल्या समन्वयातून जिल्हा परीषदेचा कारभार झाला त्यात समाधानी असून जिल्ह्याच्या विकासात सदस्यांचा मोठा वाटा असल्यांचे सांगितले. सविता गावीत व रणधीर सोमवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले. 
सूत्रसंचालन डॉ.राहुल चौधरी तर आभार डॉ.सारीका बारी यांनी    मानले.
 

Web Title: Goodbye to moving staff and members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.