साकलीउमर येथे कोविड लसीकरणाला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST2021-05-29T04:23:39+5:302021-05-29T04:23:39+5:30
सातपुड्यातील दुर्गम भागांत कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. यामुळे लसीकरणावर परिणाम होत असल्याचे दिसून आल्यानंतर महसूल, ...

साकलीउमर येथे कोविड लसीकरणाला चांगला प्रतिसाद
सातपुड्यातील दुर्गम भागांत कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. यामुळे लसीकरणावर परिणाम होत असल्याचे दिसून आल्यानंतर महसूल, ग्रामविकास व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या मोहीम राबवून जनजागृती केली होती. त्यातून साकलीउमर गावातील शिबिरात २९२ जणांनी लसीकरण करून घेतले. यावेळी तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे, पं.स. माजी सभापती बिजा बावा वसावे, पंचायत समिती सदस्य भगतसिंग पाडवी, सरपंच उषा दिलीप पाडवी, उपसरपंच, युनिसेफ तालुका समन्वयक जितेंद्र वळवी, ग्रामसेवक अशोक पावरा, केंद्रप्रमुख कैलास सुयॅवंशी, बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल मौलवे, मोलगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे, वेली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भीमसिंग पाडवी, डाॅ. एस.एन.पिंपरे, तलाठी जयवंत पाडवी, गुलाब पाडवी, अनुप्रिया पाडवी, आरोग्यसेवक,सेविका, औषध निर्माता, आरोग्य निरीक्षक, पर्यवेक्षिका, आरोग्य कर्मचारीवर्ग, युनिसेफचे जयसिंग वसावे, प्रदीप पाडवी, जयंतीलाल ब्राह्मणे,ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग, जि.प शिक्षक, माध्यमिक शिक्षक, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.