खूषखबर; जिल्ह्याच्या भूगर्भात वाढले थेट तीन मीटर ‘वॉटर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:36 IST2019-10-30T12:36:09+5:302019-10-30T12:36:16+5:30
भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात पावसाने यंदा दिलेल्या दणकेबाज हजेरीच्या पाश्र्वभूमीवर भूजल पातळी थेट तीन ...

खूषखबर; जिल्ह्याच्या भूगर्भात वाढले थेट तीन मीटर ‘वॉटर’
भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात पावसाने यंदा दिलेल्या दणकेबाज हजेरीच्या पाश्र्वभूमीवर भूजल पातळी थेट तीन मीटरने वाढली आह़े सलग पाच वर्षे भूजल पातळीचा दुष्काळ सोसणा:या नागरिकांना या भूजल पातळीतील वाढीचा लाभ होणार आह़े भूजल सव्रेक्षण विभागाच्या सव्रेक्षणातून ही माहिती समोर आली आह़े
जुलै ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाने हजेरी लावली होती़ सर्व सहा तालुक्यात सातत्याने हजेरी लावणा:या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत़ तर लघु, मध्यम प्रकल्प, गावतलाव ओसंडून वाहत आहेत़ या पाश्र्वभूमीवर जमिनीत पाण्याचा निचरा होण्याची क्षमता अधिकपणे वाढून जमिनीखालच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आह़े यातून जिल्ह्याची भूजल पातळी ही 2़96 अर्थात तीन मीटरने वाढली आह़े गेल्या वर्षात हीच भूजल पातळी साडेतीन मीटर्पयत खोल गेल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता़ नव्याने करण्यात आलेल्या सव्रेक्षणानुसार जुलै 2020 र्पयत ही पातळी स्थिर राहणार असल्याने शेती आणि पिण्याची समस्या मिटणार आह़े विभागाने जिल्ह्यात 50 विहिरींचे निरीक्षण केले आह़े
भूजल सव्रेक्षण विभागाने नंदुरबार तालुक्यातील 13 विहिरींचे निरीक्षण केले होत़े सप्टेंबर महिन्यात झालेल्या सव्रेक्षणादरम्यान तालुक्यातील भूजल हे 3़53 मीटरने वाढल्याचे दिसून आले आह़े तालुक्याची सरासरी स्थिर भूजल पातळी ही 1़93 एवढी आह़े
नवापुर तालुक्यात 15 विहिरींच्या निरीक्षणातून भूजल 2़.55 मीटरने वाढल्याचे समोर आल़े तालुक्याची सरासरी भूजल पातळी 1़1 मीटर आह़े
धडगाव तालुक्यात 1.92 मीटरने भूजलात वाढ झाली असून सरासरी भूजल हे अर्धा मीटर असल्याचे विभागाने सांगितले आह़े
तळोदा तालुक्यात विभागाने तीन विहिरींचे निरीक्षण केल़े यात भूजल हे 2़.15 मीटरने वर आल्याचे समोर आल़े तळोदा तालुक्याची सरासरी भूजल पातळी ही 5़.53 एवढी आह़े
शहादा तालुक्यात विभागाकडून 9 विहिरींचे निरीक्षण केले गेल़े यात भूजल 3़26 मीटरने वाढल्याचे दिसून आले आह़े तालुक्याची सरासरी भूजल पातळी ही 3़53 मीटर एवढी आह़े
अक्कलकुवा तालुक्याची भूजल पातळी ही सर्वाधिक 4़35 मीटरने वाढल्याचे निरीक्षणातून समोर आले आह़े सरासरी भूजल पातळी ही 1़15 मीटर एवढी आह़े
प्रत्येक तालुक्याच्या सरासरी भूजल पातळीपेक्षा दीड ते दोन मीटरने भूजल वाढल्याचे दिसून आल्याने एकूण जिल्ह्याची सरासरी ही 2़96 एवढी राहिली आह़े यातून जिल्ह्याच्या जमिनीत वर्षभरापेक्षा अधिक काळ पुरेल एवढे पाणी निर्माण झाले आह़े
4भूजल सव्रेक्षण विभागाने अक्कलकुवा तालुक्यात डिगीआंबा, करणपाडा, अक्कलकुवा, रायसिंगपुर, गव्हाळी, खापर, धडगाव तालुक्यात उमराणी खुर्द, धडगाव, बिजरी, धनाजे, नंदुरबार तालुक्यात ढंढाणे, अक्राळे, वावद, समशेरपूर, ढेकवद, धानोरा, नंदुरबार, पथराई, शनिमांडळ, कार्ली, रजाळे, सुंदरदे, लोय यासह नवापुर 15, शहादा 9, धडगाव 4 तर अक्कलकुवा तालुक्यातील 6 विहिरींचे निरीक्षण करुन विभागाने अहवाल दिला आह़े