महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 12:17 IST2019-07-04T12:17:04+5:302019-07-04T12:17:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील शनिमांडळ येथून नंदुरबार शहरात आलेल्या महिलेची सोन्याची पोत अज्ञात चोरटय़ांनी लांबवल्याची घटना मंगळवारी ...

The gold vessel of the woman's throat will be removed | महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील शनिमांडळ येथून नंदुरबार शहरात आलेल्या महिलेची सोन्याची पोत अज्ञात चोरटय़ांनी लांबवल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली़ घटनेने खळबळ उडाली आह़े 
सुजाता विजयसिंग जाधव ह्या शनिमांडळ येथून शहरात आल्या होत्या़ दरम्यान अंधारे चौकात आल्यानंतर त्यांच्याकडील सोन्याची पोत ठेवलेली पिशवी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली़ पिशवी मिळून न आल्याने त्यांनी परिसरात चौकशी केली, परंतू ती मिळून आली नाही़ अखेर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली़ त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात 30 ग्रॅम वजनाची सोन्याची 84 हजार रुपये किमतीची पोत चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस नाईक पाडवी करत आहेत़ मंगळवारी आठवडे बाजार असल्याने बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत़े गर्दीचा फायदा घेत चोरटेही येतात़ यातच अशा प्रकारच्या घटना घडत आहेत़ 
 

Web Title: The gold vessel of the woman's throat will be removed