गुजरातकडे जाणा:या भाजीपाल्याची वाहने अडविली

By Admin | Updated: June 2, 2017 14:23 IST2017-06-02T14:23:04+5:302017-06-02T14:23:04+5:30

ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर आंदोलनकत्र्या शेतक:यांना घेतले ताब्यात

Going to Gujarat: This vegetable bar is blocked | गुजरातकडे जाणा:या भाजीपाल्याची वाहने अडविली

गुजरातकडे जाणा:या भाजीपाल्याची वाहने अडविली

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.2- शेतकरी संपाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात आंदोजलनांची तीव्रता वाढत असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे गुजरात राज्यात जाणा:या भाजीपाल्याच्या गाडय़ा थांबवण्यात आल्या होत्या़ प्रकाशा ता़ शहादा येथे ब:हाणपूर-अंकलेश्वर मार्गावरील चौफुलीवर हे आंदोलन करण्यात आल़े या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होत़े या आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली होती़
दरम्यान नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर आणि अक्कलकुवा येथील बाजार समितीत सकाळपासून शुकशुकाट पसरला होता़ धान्याची कोणत्याही प्रकारे खरेदी विक्री न झाल्याने व्यापारी बसून होत़े 
शेतकरी संपाचा परिणाम इतर व्यवसायांवर होत आह़े नंदुरबार शहरातील विविध भागात असलेल्या हॉटेलच्या मेनूमधून भाजीपाल्यापासून तयार झालेले पदार्थ बाद झाले आहेत़ 

Web Title: Going to Gujarat: This vegetable bar is blocked