जिल्हाभरात बकरी ईद शांततेत साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST2021-07-22T04:20:18+5:302021-07-22T04:20:18+5:30
नंदुरबार : बकरी ईद बुधवारी जिल्ह्यात साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ईद साधेपणाने साजरी करण्याचे आदेश असल्याने ...

जिल्हाभरात बकरी ईद शांततेत साजरी
नंदुरबार : बकरी ईद बुधवारी जिल्ह्यात साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ईद साधेपणाने साजरी करण्याचे आदेश असल्याने मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज पठण केले.
नंदुरबार शहरातील विविध भागांत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लीम बांधवांकडून गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज पठण करत, नंतर एकमेकांच्या भेटी घेत शुभेच्छा दिल्या. शहरातील विविध मशिदींच्या माैलवींची परवानगी घेत मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले.
दरम्यान, ईदच्या पार्श्वभूमीवर शहादा, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा याठिकाणीही तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु, सर्व ठिकाणी शांततेत बकरी ईद साजरी करण्यात आली. बहुतांश जणांनी सोशल मीडियातून एकमेकांना शुभेच्छा संदेश देत यंदाही बकरी ईद साजरी केल्याची माहिती देण्यात आली आहे.