देशाच्या संघाचे नेतृत्व करण्याचे ध्येय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:04 IST2019-06-16T12:04:01+5:302019-06-16T12:04:06+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : क्रिकेट आणि मैदानी खेळांची क्रेझ असणा:या युगात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख ...

देशाच्या संघाचे नेतृत्व करण्याचे ध्येय
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : क्रिकेट आणि मैदानी खेळांची क्रेझ असणा:या युगात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण झालेल्या हॉकीकडे फारसे गांभिर्याने पाहिले जात नाही. परंतु आदिवासी दुर्गम भागात राहिलेला आणि नर्मदा आंदोलनातर्फे चालविल्या जाणा:या जीवनशाळेत शिकलेला एक युवक हॉकीच्या प्रेमात पडतो आणि थेट राज्याचे नेतृत्व करतो.. होय मुळचा मांडय़ापाडा, ता.धडगाव व सध्या वाडीपुनर्वसन मध्ये राहणारा खुमानसिंग पटले या युवकाच्या जिद्दीची सध्या प्रशंसा होत आहे. त्याच्याशी केलेली बातचित..
हॉकीकडे कसा वळला आणि थेट राज्याचे नेतृत्व करण्याची संधी कशी मिळाली..
माङो शिक्षण वाडी पुनर्वसनच्या जीवनशाळेत झालेले आहे. पाचवीत माझी लोणी, जि.अहमदनगर येथील आश्रमशाळेत निवड झाली. दुस:याच वर्षी मी पुण्याच्या क्रिडा प्रबोधणीसाठी निवडलो गेलो. तेथे फुटबॉल खेळासाठी प्रय} करीत असतांना माझा एक मित्र हॉकी खेळत होता. त्याचा खेळ पाहून मी त्याकडे आकर्षीलो गेलो. तोर्पयत हॉकी म्हणजे काय? हे देखील माहिती नव्हते. हॉकी निवडले आणि खेळू लागलो. माङयातील चपळता आणि मेहनत पाहून माङो प्रशिक्षक अजरून लाकडा यांनी माङयावर मेहनत घेतली. आंतरशालेय, आंतर विभागीय स्पर्धामधील खेळ पाहून माझी राज्याच्या संघात निवड झाली. गोलकिपर आणि थेट सहा वर्ष संघाच्या नेतृत्त्वाची संधी मिळाली.
पुढचे ध्येय काय आहे?
राष्ट्रीय संघात स्थान मिळविणे आणि अंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळणे हे माङो ध्येय आहे. सध्या पोलीस दलात भरती झालो असल्याने खेळ थांबलेला आहे. लवकरच पुन्हा खेळाकडे लक्ष देणार आहे. देशाचे नेतृत्त्व करण्याची आपली इच्छा असून त्यादृष्टीने मेहनत घेत आहे.
हॉकी राष्ट्रीय खेळ असला तरी त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे. या खेळातही तुम्हाला भरपूर संधी आहेत. या खेळाकडे विद्याथी, युवक वळण्यासाठी शासनाचे प्रय} असले तरी स्थानिक स्तरावर उदासिनता दिसून येते
युवकांनो न्यूनगंड बाजूला ठेवा
सातपुडय़ातील द:याखो:यातील युवकांमध्ये न्यूनगंड मोठा दिसून येतो. दुस:यापेक्षा स्वत:ला कमी लेखू नका. आपण दुस:यापेक्षा श्रेष्ठ आहोत ही मानसिकता ठेवा. ज्या खेळामध्ये आवड आहे तो आवडीने खेळा. मेहनत घ्या, निसर्गाने आपल्यामध्ये जन्मत:च चपळता, काटकपणा दिलेला आहे. त्यामुळे आपली वेगळी छबी असते. ती टिकवून ठेवली पाहिजे. योग्य प्रशिक्षक, योग्य फ्लॅटफॉर्म आणि स्वत:मधील आत्मविश्वास मिळाला तर तुम्ही सहज पुढे जाऊ शकता असेही खुमानसिंग पटले याने सांगितले.