वरुळ कानडी येथे गो शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST2021-06-19T04:20:57+5:302021-06-19T04:20:57+5:30

वरुळ कानडी येथे मोहन जगन्नाथ सोनार व राजेंद्र सोनार यांनी यमुना गो सेवा ट्रस्टची स्थापना करून गायींची सेवा करण्याच्या ...

Go School at Varul Kandi | वरुळ कानडी येथे गो शाळा

वरुळ कानडी येथे गो शाळा

वरुळ कानडी येथे मोहन जगन्नाथ सोनार व राजेंद्र सोनार यांनी यमुना गो सेवा ट्रस्टची स्थापना करून गायींची सेवा करण्याच्या निर्धार केला आहे. गेल्या सात वर्षांपूर्वी गावाच्या बाहेर एका छोट्याशा शेडमध्ये एक-दोन गायींपासून सुरुवात केली. आज या गो शाळेत २५ ते ३० गायी व वासरू आहेत. गो शाळेसाठी सुरुवातीपासून त्यांना परिश्रम घ्यावे लागले आहेत. मात्र त्यांनी गो सेवा सोडली नाही. हळूहळू ग्रामस्थांनीही त्यांना सहकार्य केले. आता तालुक्यासह परिसरातील शेतकरी, विविध संस्था, संघटना त्यांना मदत करीत आहेत. काही दानशूर व्यक्तींनी शेडसाठी साहित्य दिले आहे. शहादा शहरातील सिद्धी विनायक मंदिर ट्रस्टतर्फे प्रकाशासाठी सोलर विद्युत दिले आहे तर हरिओम ट्रस्टतर्फेही मदत करण्यात आली आहे. गायींची सेवा करणे हे चांगले काम असून मोहन सोनार व राजेंद्र सोनार यांना विविध सेवाभावी संघटना संस्थांनी सहकार्य करणे अपेक्षित असून ही गो शाळा नावारूपाला येईल, अशी प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदचे अजय शर्मा यांनी व्यक्त केली.

Web Title: Go School at Varul Kandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.