चर्मकार समाजातील गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST2021-08-26T04:32:27+5:302021-08-26T04:32:27+5:30

नंदुरबार : येथील संत शिरोमणी रविदास व्यायामशाळा व समस्त चर्मकार समाज नंदुरबार यांच्या विद्यमाने आयोजित गुणगौरव सोहळ्यातून समाजातील विविध ...

The glory of the virtues of the leatherworker community | चर्मकार समाजातील गुणवंतांचा गौरव

चर्मकार समाजातील गुणवंतांचा गौरव

नंदुरबार : येथील संत शिरोमणी रविदास व्यायामशाळा व समस्त चर्मकार समाज नंदुरबार यांच्या विद्यमाने आयोजित गुणगौरव सोहळ्यातून समाजातील विविध परीक्षा व क्षेत्रांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच कोरोना महामारी काळात विशेष कामगिरी बजाविणाऱ्या समाजबांधवांचादेखील सन्मान करण्यात आला.

नंदुरबार शहरातील संत शिरोमणी रविदास चौकात गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नेताजी सुभाषचंद्र बोस मंडळाचे अध्यक्ष ईश्वर चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार पालिकेतील बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे, चर्मकार समाजातील राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक दगडू अजिंठे, ज्येष्ठ नागरिक चतुर अहिरे, शंकर अहिरे, चर्मकार समाजाचे नंदुरबार अध्यक्ष विजय अहिरे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात चर्मकार समाजातील १० वी, १२ वी व विविध शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या जयश्री पवार, कोमल अहिरे, जयेश अहिरे, निकिता अहिरे, भाग्यश्री पवार, वैशाली सूर्यवंशी, जगदीप अहिरे, धीरज अहिरे, हंसराज अहिरे, कुणाल अहिरे, अमित अहिरे, आकाश अहिरे, कुणाल रजनिकांत अहिरे, सिद्धार्थ अहिरे, रोहित अहिरे, ललित अहिरे, विशाल अहिरे, चेतन तिजविज, रोहित अहिरे, दिनेश अहिरे, गायत्री समशेर, जयेश जाधव, वेदांत चव्हाण, मयूर अहिरे या यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा प्रमाणपत्रासह शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला.

दरम्यान, कोरोना महामारी काळात पोलीस, प्रशासकीय, वैद्यकीय, बँक या क्षेत्रांमध्ये सेवा बजावणाऱ्या प्रकाश अहिरे, विजय ठाकरे, रवी पवार, विजय अहिरे, प्रवीण पवार, उज्ज्वला अहिरे, कलाबाई अहिरे, कविता समशेर, अभिलाशा अहिरे या कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पालिकेचे बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी महिला सशक्तीकरणासह शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ईश्वर चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक दगडू अजिंठे यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन रमेश मलखेडे तर आभार विजय अहिरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दीपक अहिरे, धनराज अहिरे, सुरेश अहिरे, प्रवीण अहिरे, मुकेश अहिरे, राकेश कंढरे, मोहन अहिरे, संजय अहिरे, हंसराज अहिरे, हरीश अहिरे, अर्जुन अहिरे, मनोज समशेर, राजेंद्र पवार, ईश्वर सोनवणे, गंगाराम झांझरे, महेंद्र चव्हाण, विनोद अहिरे, संतोष अहिरे, राजू अहिरे, विनायक अहिरे, नितीन अहिरे, अशोक अहिरे, नंदलाल अहिरे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: The glory of the virtues of the leatherworker community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.