अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना मे महिन्याच मोफत धान्य देण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST2021-04-30T04:38:55+5:302021-04-30T04:38:55+5:30
चौकट. समितीच्या उपस्थिती वाटप व्हावे. शासनाचे मोफत धान्य लाभार्थ्यांना वाटप करण्याकरिता प्रशासनाने गावपातळीवर गेल्या वर्षीच ग्रामस्तरीय समिती तयार केली ...

अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना मे महिन्याच मोफत धान्य देण्यात
चौकट.
समितीच्या उपस्थिती वाटप व्हावे. शासनाचे मोफत धान्य लाभार्थ्यांना वाटप करण्याकरिता प्रशासनाने गावपातळीवर गेल्या वर्षीच ग्रामस्तरीय समिती तयार केली होती. सदर समितीमुळे साहजिकच रेशन वितरणात पारदर्शकता येऊन काळ्या बाजाराला लगाम बसला होता. आताही या समितीने आपल्या गावातील लोकांना रेशन मिळण्यासाठी दुकानदाराकडे जातीने हजर राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
मे महिन्याचे मोफत रेशन देण्याची कार्यवाही उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारी देखील करण्यात आली आहे. पाॅस मशीनमधून दोन पावत्या निघाल्या नंतर एक लाभार्थ्यांसाठी व दुसरी आपल्याकडे जतन करण्याची सूचना देण्यात आली आहे. कुठेही पावती विना धान्य देताना दुकानदार आढळून आले तर जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
संदीप परदेशी. पुरवठा निरीक्षक. तहसील कार्यालय तळोदा.