बँक अधिका:यांना शस्त्र परवाने द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:12 IST2019-06-21T12:12:32+5:302019-06-21T12:12:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात बँक लुटीचे प्रयत्न झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खाजगी ...

बँक अधिका:यांना शस्त्र परवाने द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यात बँक लुटीचे प्रयत्न झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी बँकांच्या अधिका:यांची बैठक बोलावली होती़ यावेळी बँकेच्या अधिका:यांनी पोलींसांनी शस्त्र परवाने देण्याची मागणी केली़
पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी सायंकाळी ही बैठक घेण्यात आली़ यावेळी पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्यासह अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, राजेंद्र शिंगटे,बाळासाहेब भापकर यांनी बँक अधिका:यांकडून सुरक्षा उपायांचा आढावा घेतला़
बैठकीत जळगाव जिल्ह्यातील दरोडय़ाच्या प्रयत्नाची घटना तसेच नाशिक येथील खाजगी वित्तीय संस्थेवर दरोडय़ाचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या होत्या़ या पाश्र्वभूमीवर बँकांनी सतर्कता बाळगण्याचे पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी सांगितल़े दरम्यान बँकांनी दर 15 दिवसात सीसीटीव्ही तपासणी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत संपर्कात राहण्याचे सांगितल़े
बँकांच्या अधिका:यांनी बैठकीत शाखांसमारे होणारी वाहतूक कोंडी, पार्किग व्यवस्था, आठवडे बाजाराच्या दिवशी बँकांकडे पोलीसांनी लक्ष द्यावे आदी मागण्या केल्या़ बँक अधिका:यांच्या विविध मागण्यांवर पोलीस दलाकडून विचारविनिमय करुन कामकाज करणार असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितल़े