नंदुरबारातील ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेचा तिघांकडून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:17 IST2019-03-12T11:17:10+5:302019-03-12T11:17:27+5:30

नंदुरबार : ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेचा तिघांनी विनयभंग केल्याची घटना नंदुरबारात घडली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारातील ...

The girl who ran a beauty parlor in Nandurbar was allegedly molested by the three | नंदुरबारातील ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेचा तिघांकडून विनयभंग

नंदुरबारातील ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेचा तिघांकडून विनयभंग

नंदुरबार : ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेचा तिघांनी विनयभंग केल्याची घटना नंदुरबारात घडली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबारातील कासार गल्ली भागात ब्युटी पार्लर चालविणाºया महिलेस नितीन काशिनाथ चौधरी व आणखी दोन जणांनी घरी जावून धमकी दिली. ब्युटी पार्लर चालवत असतांना गिºहाईक घेवून येत होतो. त्यापोटी पाच हजार रुपये खंडणी द्यावी अन्यथा महिलेला पळवून नेण्याची धमकी दिली. यावेळी चौधरी याने महिलेशी अंगलट करून तिचा विनयभंग देखील केला. घरात असलेले दिर व सासरे यांना देखील मारहाण करून शिविगाळ केली. त्यानंतर तिघे तेथून पसार झाले.
याबाबत महिलेने फिर्याद दिल्याने नितीन चौधरी व त्याच्यासोबत असलेल्या दोघांविरुद्ध शहर पोलिसात मारहाण, विनयभंग व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार बिºहाडे करीत आहे.

Web Title: The girl who ran a beauty parlor in Nandurbar was allegedly molested by the three