रेल्वेतून पडलेली बालिका पालकांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:43 IST2018-07-17T12:43:44+5:302018-07-17T12:43:48+5:30

The girl from the train was released by the parents | रेल्वेतून पडलेली बालिका पालकांच्या स्वाधीन

रेल्वेतून पडलेली बालिका पालकांच्या स्वाधीन

विसरवाडी : चिंचपाडा, ता.नवापूर येथील रेल्वेस्थानकावर झारखंड येथून गुजरात राज्यात जाणा:या दाम्पत्याची चारवर्षीय बालिका गर्दीत रात्री रेल्वेरुळावर पडली. त्यात ती जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस व रेल्वे पोलीस यांनी वेगाने तपासचक्रे फिरवून मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.
सविस्तर वृत्त असे की, झारखंड येथून साहू दाम्पत्य त्यांच्या चारवर्षीय मुलगी छाया चंदनकुमार साहू हिच्यासह गुजरात राज्यात रेल्वेने जाण्यास निघाले. चिंचपाडा, ता.नवापूर येथे रेल्वे थांबली असता  रात्री तीन वाजता गर्दीत ती मुलगी रेल्वेतून खाली रुळावर पडली. मात्र ही बाब तिच्या पालकांच्या लक्षात आली नाही. ती तेथे तशीच पडून राहिली. ही बाब प्रवाशांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित 108 रुग्णवाहिकेस पाचारण केले व विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचा:यांनी जखमी बालिकेवर उपचार करून त्वरित विसरवाडी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी नंदुरबार रेल्वे पोलिसांना कळवले. या वेळी विसरवाडी, चिंचपाडा व नंदुरबार रेल्वे पोलिसांनी त्वरित त्या रेल्वेचा तपास घेत तपासचक्रे हाताळत पहाटे सहा वाजेर्पयत बालिकेच्या आई-वडिलांना खबर दिली. त्यानंतर मुलीचे आई-वडील विसरवाडी पोलीस स्टेशनला सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हजर झाले. तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व पोलीस कर्मचा:यांनी बालिकेस त्यांच्या स्वाधीन केले.

Web Title: The girl from the train was released by the parents