विद्यार्थिनीने जाळून घेतले
By Admin | Updated: March 4, 2015 14:54 IST2015-03-04T14:54:49+5:302015-03-04T14:54:49+5:30
पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथील नववीच्या विद्यार्थिनीने मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून घेत पेटवून घेतले.

विद्यार्थिनीने जाळून घेतले
जळगाव : पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथील नववीच्या विद्यार्थिनीने मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून घेत पेटवून घेतले. या विद्यार्थिनीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दहीगाव संत येथे धरमसिंग पाटील हे आपल्या कुटुंबासह राहतात. मंगळवारी सकाळी ते शेतात कामाला गेले होते. तर त्यांची पत्नी बाहेरगावी गेली होती. या दरम्यान त्यांची मुलगी सविता (वय-१५) ही शाळेत गेलेली होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास सविता शाळेतून घरी आल्यानंतर तिने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून घेत पेटवून घेतले. यात ती ७५ टक्के भाजली आहे.
तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
या घटनेनंतर सविताच्या आईची प्रकृती खराब झाली होती. त्यामुळे संध्याकाळी सविताचे नातेवाईक थांबून होते. जळीत सविता ही गावातील चंद्रकुवर हिलालसिंग राजपूत शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.