शाळेला शेगडी व सिलिंडरची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:44 IST2019-11-24T12:44:11+5:302019-11-24T12:44:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : शहादा तालुक्यातील अंबापूर येथील जि.प. शाळेला शिक्षक वडील असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ...

शाळेला शेगडी व सिलिंडरची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : शहादा तालुक्यातील अंबापूर येथील जि.प. शाळेला शिक्षक वडील असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ डबल शेगडी सिलिंडर म्हणून भेट देवून आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्व.चंद्रसिंग गुलाबसिंग खेडकर हे सावखेडा, ता.शहादा येथील जि.प. शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. 2001 मध्ये त्यांचे हृदयविकाराने अचानक निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ आरोग्य सेवक म्हणून कलसाडी, ता.शहादा येथे कार्यरत असलेला मुलगा राकेश चंद्रसिंग पावरा व लोणखेडा महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रा.उर्मिला राकेश पावरा यांनी अंबापूर येथील जि.प. मराठी शाळेला लोखंडी गॅस शेगडी व डबल सिलिंडर भेट दिले. या वेळी मुख्याध्यापक चैत्राम चव्हाण, संजय पाटोळे, पदम पराडके, एकनाथ बिरादार, अनिल राठोड, मनिषा इंगळे, सायसिंग वसावे, स्वयंपाकी व मदतनीस ममताबाई पावरा, कलीबाई पावरा, अनुसयाबाई पवार आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक चव्हाण यांनी पावरा कुटुंबाचे आभार मानले.