दुचाकीवर जाणा:या व्यापा:याला लुटले

By Admin | Updated: June 6, 2017 11:43 IST2017-06-06T11:43:41+5:302017-06-06T11:43:41+5:30

काळंबाची घटना : एक लाख 60 हजार लंपास

Getting to Bike: The Trades: They Looted | दुचाकीवर जाणा:या व्यापा:याला लुटले

दुचाकीवर जाणा:या व्यापा:याला लुटले

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि. 6 - मोटरसायकलीवर जाणा:या व्यापा:याला अडवून चौघा दरोडेखोरांनी त्यांच्याकडील एक लाख 60 हजार रुपये जबरीने चोरून नेल्याची घटना नंदुरबार-विसरवाडी रस्त्यावर काळंबा फाटय़ानजीक रात्री घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मारहाणीत व्यापारी जखमी झाले आहे. 
नंदुरबार येथील एस.के.नगर भागात राहणारे व्यापारी इकबाल अब्दुल करीम मेमन (56) हे आपल्या स्कूटरने नंदुरबारकडे येत होते. रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास दोन मोटरसायकलीवर आलेल्या चौघा युवकांनी त्यांना अडविले. त्यापैकी एकाने मेमन यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. त्यांच्याकडील बॅग हिसकवून पोबारा केला. बॅगेत एक लाख 60 हजार रुपये रोख तसेच तीन चेक व हिशोबाची डायरी होती. या घटनेत जिकर अब्दुल करीम मेमन हे देखील जखमी झाले. इकबाल मेमन यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Getting to Bike: The Trades: They Looted