शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

घरकुल वाटपचा तिढा सुटता सुटेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:43 PM

नंदुरबार : नंदुरबारातील बेघर योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले 876 घरकुलांचे वाटप होत नसल्याची स्थिती आहे. बांधकाम पुर्ण होऊन देखील याद्यांच्या ...

नंदुरबार : नंदुरबारातील बेघर योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले 876 घरकुलांचे वाटप होत नसल्याची स्थिती आहे. बांधकाम पुर्ण होऊन देखील याद्यांच्या घोळामुळे त्यांचे वापट रखडले आहे. घरकुलं कधी वाटप होतात याकडे लक्ष लागून आहे.  नंदुरबारात घरकुलांचा प्रश्न गेल्या तीन वर्षापासून धगधगता आहे. बेघर संघर्ष समिती व समाजवादी पार्टीतर्फे हा प्रश्न लावून धरण्यात आला आहे. दोन वर्षापूर्वी अनेक नागरिकांनी भोणे फाटा व जिल्हा रुग्णालयासमोरल घरकुलांचा ताबा बळजबरीने घेतला होता. त्यांना पोलीसांच्या मदतीने काढण्यात आले होते. त्यानंतरही वेळोवेळी मोर्चा व धरणे आंदोलने देखील करण्यात आले आहेत. वारंवारच्या आंदोलनांच्या दृष्टीने घरकुल वाटपाचा तिढा तातडीने सुटणे आवश्यक आहे. पाच वर्षापूर्वी मंजुरीशहरात बेघरांसाठी घरकुल बांधकामाला चार वर्षापूर्वी राज्य शासनाने मंजुरी दिली होती. पालिकेच्या प्रस्तावानुसार एकुण 1176 घरकुल बांधकामाचे प्रस्तावीत होते. त्यासाठी भोणे फाटय़ाजवळील जागा आणि जिल्हा रुग्णालयासमोरील जागा निश्चित करण्यात आली. परंतू प्रतिसाद पहाता केवळ 876 घरकुलांच्या निर्मितीचा सुधारीत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. शासनाने तेवढय़ा घरकुलांना मंजुरी देत निधी देखील वर्ग केला. तीन वर्षापासून दोन्ही ठिकाणी चार मजली अपार्टमेंटच्या स्वरूपात प्रत्येकी वनरूम किचनची घरकुले तयार करण्यात आली आहेत. त्यांचे बांधकाम  पुर्ण झाले आहे. लाभार्थी निवडीचा वादघरकुलांचे लाभार्थी निवडीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. आधी बेघर संघर्ष समिती व नंतर त्याच पदाधिका:यांची समाजवादी पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. त्यांच्या मागणीनुसार आपण दिलेल्या यादीनुसारच लाभार्थी निवडण्यात यावे. परंतू शासनाच्या नियमानुसारच लाभार्थी निवड करण्यात येईल असे पालिकेचे म्हणने आहे. लाभार्थी निवडीच्या यादी जाहीर होत नाही त्यामुळे दोन वर्षापूर्वी शेकडो कुटूंबियांनी थेट घरकुलांचा ताबा घेतला. अखेर त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ठेकेदारांने उर्वरित कामे पुर्ण केली. आता कामे पुर्ण होऊन ठेकेदाराने पालिकेकडे ते वर्गही केले असल्याचे सांगण्यात आले.जुने घर किंवा जागा जमा करावीशासनाच्या नियमानुसार लाभार्थीला त्याच्याकडे असलेले जुने घर किंवा जागा ही पालिकेकडे वर्ग करूनच घरकुलाचा ताबा दिला जातो. तसे करण्यास मात्र अनेक कुटूंबांचा नकार असतो. पालिकेने नव्याने मागविलेल्या अर्जाबाबतही फारशी उत्सूकता दाखविण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ही घरकुले अनेक दिवसांपासून धुळखात पडून आहेत. 3,340 झोपडय़ांची नोंदशहरात 2000 पूर्वीच्या जवळपास 14 झोपडपट्टया व तीन हजार 340 झोपडय़ा असल्याची         नोंद पालिकेकडे आहे. त्यातील अनेकांकडे फोटोपास नाही. पूर्वी दोन हजार 275 रुपये भरून फोटोपास मिळत होता. आता केवळ 425 रुपयांमध्ये फोटोपास मिळतो. असे असले तरी फोटोपास काढण्याकडे अनेकांचा कल नसल्याचेच दिसून येत आहे.