शांती नगरातून पावणेदोन लाखाचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:56 IST2019-11-02T12:56:03+5:302019-11-02T12:56:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील शांती नगरातील घरातून पावणेदोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना 23 ते ...

शांती नगरातून पावणेदोन लाखाचे दागिने लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील शांती नगरातील घरातून पावणेदोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान घडली़ याप्रकरणी घरकाम करणा:या संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
शांतीनगरातील लताबाई अशोक माळी यांच्या सूनेची 1 लाख 13 हजार 600 रुपयांची सोन्याची पोत आणि 34 हजार रुपयांचे कानातले दागिने सापडत नसल्याचे 25 रोजी समजून आल़े त्यांनी घरात शोध घेऊनही दागिने मिळून आले नाहीत़ हे दागिने घर कामासाठी ठेवलेल्या महिलेने चोरुन नेले असावेत असा संशय बळावल्यानंतर त्यांनी पोलीसात धाव घेतली़ याबाबत लताबाई माळी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन घरकाम करणा:या संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत़
दरम्यान पोलीसांकडून संबधित महिलेची चौकशी सुरु आह़े