तळोदा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुढील आर्थिक वर्षाच्या साडेसत्तावीस कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST2021-02-25T04:38:52+5:302021-02-25T04:38:52+5:30

वसाहतीतील पायाभूत सुविधांना प्राधान्य द्या नगर पालिकेने नगर उत्थान कार्यक्रम व १५ वा वित्त आयोगातून साधारण ११ कोटींची तरतूद ...

General meeting of Taloda Municipality approves budget of Rs. | तळोदा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुढील आर्थिक वर्षाच्या साडेसत्तावीस कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

तळोदा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुढील आर्थिक वर्षाच्या साडेसत्तावीस कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

वसाहतीतील पायाभूत सुविधांना प्राधान्य द्या

नगर पालिकेने नगर उत्थान कार्यक्रम व १५ वा वित्त आयोगातून साधारण ११ कोटींची तरतूद केली आहे. ही निश्चितच चांगली बाब असली तरी शहराच्या हद्दीत गेल्या पाच वर्षांपासून समाविष्ट केलेल्या २५, ३० पैकी केवळ चार, पाच वसाहती वगळता इतर वसाहतींमध्ये गटारी, रस्ते व पिण्याचे पाणी या सारख्या पायाभूत सुविधा नाहीत. या वसाहतीतील रहिवाशांनी सातत्याने लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहे. तरीही आतापर्यंत त्यांच्या तोंडाला पानेच पुसण्यात आली आहे. अर्थ संकल्पात मोकळ्या जागा विकसित करण्याचे नमूद केले आहे. परंतु नवीन वसाहतीतील पायाभूत सुविधांबाबत उल्लेख नाही. साहजिकच यामुळे रहिवाशांनी शंका उपस्थित केली आहे. निदान यंदा तरी पायाभूत सुविधांना प्राधान्य देऊन हा मार्गी लावावा, अशी मागणी आहे.

Web Title: General meeting of Taloda Municipality approves budget of Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.