नंदुरबार जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, लघुसिंचन या विभागांच्या कामकाजावर ताशेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 12:35 IST2018-01-13T12:35:52+5:302018-01-13T12:35:58+5:30

नंदुरबार जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, लघुसिंचन या विभागांच्या कामकाजावर ताशेरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी विविध विभागांच्या कामकाजावर ताशेरे ओढत अधिका:यांची झाडाझडती घेतली़ आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, लघुसिंचन आणि रोजगार हमी योजना या विभागांच्या कामकाजावर सदस्यांनी नापसंती व्यक्त केली़
सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, उपाध्यक्ष सुहास नाईक, अर्थ समिती सभापती दत्तू चौरे, आरोग्य समिती सभापती हिराबाई पाडवी, समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी़एम़मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे उपस्थित होत़े सभेच्या प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचून विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला़ आढाव्यानंतर विभागांच्या कामकाजावर सदस्यांनी प्रश्न उपस्थित करून अधिका:यांना धारेवर धरल़े
बंधारे भूमिपूजनापासून डावलल्याचा आरोप
जिल्ह्यात लघुसिंचन विभागातर्फे मंजूर करण्यात आलेल्या बंधा:यांचे काम सुरू करण्यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य किंवा पदाधिकारी यांना बोलावले जात नसल्याच्या मुद्दय़ांवरून सदस्य भरत गावीत यांनी नाराजी व्यक्त केली़ त्यांनी सांगितले की, भूमिपूजन कार्यक्रमास गेल्याने त्या कामांवर संबधित सदस्यांचे लक्ष राहून कामे चांगली होती़ परंतू जिल्हा आणि तालुकास्तरावरील अधिकारी ठेकेदार नियुक्त करून मोकळे होतात़ यावर उत्तर देताना मुख्य कार्यकरी अधिकारी बिनवडे यांनी संबधितांना सूचना केल्या़ यावेळी सदस्य सागर तांबोळी यांनीही जुन्या बंधा:यांच्या दुरूस्तीचा मुद्दा उपस्थित करत लक्ष वेधून घेतल़े
स्वच्छता विभाग उदासिन
धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या कामाकाजाबाबत प्रश्न उपस्थित करताना सदस्या संध्या पाटील यांनी वैयक्तिक शौचालयांची कामे चांगली करूनही अनुदान मिळत नाही, मात्र ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिले तात्काळ पारित केली जातात असा आरोप केला़ यात सदस्य योगेश पाटील यांनी धडगाव तालुक्यात घनकचरा आणि सांडपाणी निमरुलनासाठी एकही रूपयाचा निधी गेल्या तीन वर्षात का, दिला नाही असा सवाल उपस्थित केला़ धडगाव तालुक्यात ठेकेदारांनी निर्माण केलेली शौचालये निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोपही त्यांनी केली़
अपंग युनिटचा मुद्दा गाजला
सभेत शिक्षण विभागाचा आढावा घेत असताना भरत गावीत यांनी 2009 मध्ये बंद झालेल्या अपंग युनिटच्या कर्मचा:यांना शिक्षण विभागात वर्ग करण्याच्या प्रक्रियेची माहिती मागवा, असा प्रश्न केल्यावर शिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी यांचा गोंधळ उडाला़ या भरत्या नियमबाह्य असल्याचा आरोप सदस्य भरत गावीत यांनी करून चौकशीची मागणी लावून धरली़
माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिकेत पाटील यांनी जिल्ह्यातील पाच शाळांचे समायोजन करत असल्याची माहिती दिली़
प्राथमिक शाळांबाबत माहिती देताना राहुल चौधरी यांनी 57 शाळांचे समायोजन करण्यासाठी समितीने पाहणी केल्याची माहिती दिल्यानंतर अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत करत एक शिक्षकी शाळा आणि कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरील स्थिती समजावून दिली़ यात किरसिंग वसावे यांनी जांगठी परिसरातील शाळांमध्ये शिक्षक घरी राहून स्थानिक तरूणांना 100 रूपये रोजाने शाळेवर शिकवण्यासाठी जात असल्याचे वास्तव सांगितल़े याप्रकरणी संबधित केंद्रप्रमुखावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली़
सभेत आष्टे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिका:याच्या गैरवर्तनाची तक्रार करत त्यांना निलंबित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी एऩडी़बोडके यांच्याकडे केली़ शेवटी आयत्या वेळीचे विषय घेऊन त्यांना निधी मंजूर करण्यात आला़ चार पशुवैद्यकीय दवाखाने निर्मिती, भगदरी येथे पशुवैद्यकीय दवाखाना निर्मितीसाठी निधी, बांधकाम विभागासाठी साहित्य खरेदी या विषयांना मंजूरी देण्यात आली़ सभेत विविध 21 विषयांवर चर्चा करण्यात येऊन मंजूरी देण्यात आली़ यात कर्मचा:यांच्या देयकांसह सरदार सरोवर पुनवर्सन वसाहत त:हावद, रेवानगर, गोपाळपूर, रोझवा, नर्मदा नगर, वडछील, वाडी आणि सरदार नगर येथे गाव रस्त तयार करण्यास मंजूरी देण्यात आली़ जिल्हा परिषद सदस्यांसह अक्कलकुवा, नवापूर, नंदुरबार पंचायत समिती सभापती व उपसभापती उपस्थित होत़े