हस्ती पब्लिक स्कूलमध्ये गौरव पाटील प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:25 IST2021-07-25T04:25:44+5:302021-07-25T04:25:44+5:30
गौरवला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्याची आवड होती, म्हणून बामखेडा येथील प्रवीण पाटील यांनी दोंडाईचा येथील हस्ती पब्लिक स्कूल ॲण्ड ...

हस्ती पब्लिक स्कूलमध्ये गौरव पाटील प्रथम
गौरवला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्याची आवड होती, म्हणून बामखेडा येथील प्रवीण पाटील यांनी दोंडाईचा येथील हस्ती पब्लिक स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज येथे प्रवेश मिळवून दिला. गौरवने ही मन लावून अभ्यास करत राष्ट्रीय पातळीवरील सर्वोदय अवॉर्ड स्पर्धा परीक्षेत संपूर्ण भारतातून सहावा क्रमांक मिळविला होता. जी. के. ओलिंपियाड या परीक्षेत दोन वेळा सुवर्णपदक, नॅशनल सायन्स ओलंपियाड स्पर्धा परीक्षेत सिल्वर व इंटरनॅशनल सोसियल स्टडी ओलंपियाड परीक्षेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तसेच राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याने राज्यस्तरीय आर्चरी व फुटबॉल स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. तसेच इयत्ता नववीत शाळेच्या हेडबॉय पदाची धुरा ही त्याने यशस्वीरीत्या सांभाळली होती. शिवाय स्काऊट गाईडचा ‘ राज्य पुरस्काराचा ’ सन्मानही त्याला प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे बामखेडा येथून रोज दोंडाईचा येथील शाळेत ये-जा करून त्याने हे यश संपादन केले. त्याने दहावीच्या परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे हस्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष किशोर जैन, शालेय समिती चेअरमन कैलास जैन, सदस्य डॉ. विजय नामजोशी, प्राचार्य हरिकृष्ण निगम यांनी कौतुक केले आहे.