असुविधांमुळे आरोग्यसेवेत गौडबंगाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:47 IST2020-02-29T12:47:52+5:302020-02-29T12:47:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या हजेरीबाबत चर्चा सुरु झाली आहे़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केंद्रात ...

असुविधांमुळे आरोग्यसेवेत गौडबंगाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या हजेरीबाबत चर्चा सुरु झाली आहे़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केंद्रात नियमित हजर करावे मगच बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी अशी चर्चा सुरु असतानाचा याचा लाभ मात्र परप्रांतातून आलेले बोगस ‘बंगाली’ डॉक्टर घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ प्रमाणपत्र आणि वैद्यकीय पद्धती अर्थात पॅथीची कोणतीही माहिती नसताना घातक अशा ‘स्टेरॉईड’च्या बळावर त्यांचा धंदा जोरात सुरु आहे़
जिल्ह्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सुमारे ३०० उपकेंद्रांमध्ये १ हजारच्या जवळपास आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत़ असे असतानाही जिल्ह्यातील तीन तालुक्यात बंगाली डॉक्टरांची बोगस उपचार पॅथी वेगात सुरु असल्याचे दरवेळी समोर येत आहे़ सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्याच्या काही भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील असुविधांमुळे नियुक्त करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाºयांना शहरी भागात नाईलाजाने निवास करावा लागत आहे़ यातून वैद्यकीय अधिकारी हे निवासी नसल्याने रात्री-अपरात्री येणारे रुग्ण तपासणी करण्यासाठी डॉक्टर नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दुर्गम भागातील आदिवासी बांधव बोगस डॉक्टरांच्या आश्रयाला जातात़ साधारण ५० रुपयात एक इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णास बरे वाटते म्हणून घरी जाण्याचा सल्ला देणाºया या डॉक्टरांच्या या प्रकारांमुळे काहींचा आजार वाढून मृत्यूलाही सामोरे जावे लागले होते़ यानंतरही जिल्ह्यात त्यांचा वावर कायम असून जिल्हा परिषदेनेही यातून धडा न घेता वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त पदांवर खापर फोडत पदे भरण्याची मागणी केली आहे़
विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाºयांची दहाच पदे रिक्त असल्याची माहिती आहे़ यातून सुविधा नसल्याने वैद्यकीय अधिकारी निवासी नसल्याचे पुढे येऊन तशी कारवाई होत नसल्याने बोगस डॉक्टरांचे ‘गौडबंगाल’ वाढत आहे़ येत्या काळातही हाच प्रकार सुरु राहण्याची शक्यता असली तरी वैद्यकीय अधिकाºयांना निवासासह वाहनांची सुविधा आणि आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांपर्यंत जाणारे रस्ते दिल्यास सगळ्याच समस्या सुटतील असा विश्वास दुर्गम भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे़