प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे गेट उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:40 IST2019-07-30T12:40:42+5:302019-07-30T12:40:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : हतनूर धरणाचे सर्व 41 गेट उघडल्याने सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज प्रकल्पात पाणीसाठा वाढणार असल्याने ...

Gate of Light and Sarangkheda Barrage opened | प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे गेट उघडले

प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे गेट उघडले

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : हतनूर धरणाचे सर्व 41 गेट उघडल्याने सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज प्रकल्पात पाणीसाठा वाढणार असल्याने बॅरेजेसचे सर्वच गेट उघडण्यात येत आहेत.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने या धरणाचे सर्व 41 गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमध्ये पाणीसाठय़ात वाढ होणार असल्याने सोमवारी सायंकाळपासून या दोन्ही बॅरेजेसचे सर्व गेट उघडण्याचे काम सुरू झाले. दरम्यान, प्रशासनातर्फे तापी काठावरील गावांना सतर्कतेचा  इशारा देण्यात आला असून मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून गावात सूचना फलक लिहून दवंडीही आली आहे.
दरम्यान, गेट उघडल्यामुळे तापी नदीला पूर आला असून हतनूर  धरणाचे सोडलेले पाणी पोहोचल्यानंतर नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Gate of Light and Sarangkheda Barrage opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.