गॅस व ऑनलाईन रेशनकार्ड नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:28 IST2019-07-28T12:28:28+5:302019-07-28T12:28:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पं.दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत 15 ऑगस्टपयर्ंत अंत्योदय व प्राधान्य योजनेतील ...

गॅस व ऑनलाईन रेशनकार्ड नोंदणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पं.दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत 15 ऑगस्टपयर्ंत अंत्योदय व प्राधान्य योजनेतील पात्र लाभाथ्र्यांची गॅस जोडणी व ऑनलाईन रेशनकार्ड नोंदणी करण्यात येणार येत आहे. अभियानांतर्गत या दोन्ही योजनेतील सर्व लाभाथ्र्यांना धान्य व रेशनकार्ड वाटप करण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत ग्रामीण भागात 44 हजार व शहरी भागात 59 हजारापेक्षा कमी उत्पन्न असणा:या कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेत अन्नधान्याचा व विस्तारीत उज्वला योजनेत गॅस कनेक्शनचा लाभ देण्यात येणार आहे. 30 जून 2019 अखेर पात्र कार्डधारकांची स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत नोंदणी करण्यात येणार आहे. उज्वला गॅस योजनेसाठी लाभाथ्र्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांकडे नोंदणी करावयाची आहे. स्वस्त धान्य दुकानदार प्रत्येक कार्डधारकांच्या घरी भेट देऊन आधार क्रमांक पीओएस मशिनमध्ये नोंदविणार आहे. यासाठी नागरिकांनी रेशन कार्डातील व्यक्तींची आधार नोंदणी करून घ्यावी. कार्डधारक व त्यांचे कुटुंबिय गावी रहात नसल्यास असे कार्ड कमी करण्यात येणर आहेत. कुटुंबाकडे गॅस कनेक्शन असल्याबाबतही यात नोंद घेण्यात येणार असून गॅस कनेक्शन नसलेल्या पात्र लाभाथ्र्यांकडून विस्तारीत उज्वला योजनेचा अर्ज भरून घेण्यात येणार आहे. या अर्जासोबत रेशन कार्डाची ङोरॉक्स प्रत, बँक पासबूक खाते क्रमांक प्रत, कुटुंबप्रमुख महिलेचा पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत जोडावा लागणार आहे. पात्र लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेतून वंचित रहाणार नाहीत याच्या सुचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. अपात्र लाभाथ्र्यांना लाभ मिळू नये याबाबतदेखील दक्षता घेण्यात येणार आहे. नागरिकांनी आपली नोंदणी रास्त धान्य दुकानदाराकडे करून घ्यावी. आधार नोंदणी कार्डातील व्यक्तींशी संलग्न केली नसल्यास त्वरीत आधार नोंदणीदेखील करून घ्यावी. नोंदणीत समस्या असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.