नंदुरबारात गॅरेज फोडून ७० हजारांचे साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:09 IST2019-02-19T12:08:50+5:302019-02-19T12:09:08+5:30
नंदुरबार : घर व दुकान फोडीनंतर आता चोरटे गॅरेजकडे वळले आहेत. नंदुरबारातील निझर रस्त्यावरील गॅरेज फोडून चोरट्यांनी तब्बल ७० ...

नंदुरबारात गॅरेज फोडून ७० हजारांचे साहित्य लंपास
नंदुरबार : घर व दुकान फोडीनंतर आता चोरटे गॅरेजकडे वळले आहेत. नंदुरबारातील निझर रस्त्यावरील गॅरेज फोडून चोरट्यांनी तब्बल ७० हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली. उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निझर रस्त्यावर राहुल विठ्ठल देवरे यांचे गॅरेज आहे. या गरॅजमध्ये १६ ते १७ रोजी रात्री चोरट्यांनी साहित्य चोरून नेली. त्याची किंमत ७० हजारापेक्षा अधीक आहे. सकाळी ही बाब उघडकीस आली. याबाबत राहुल देवरे यांनी उपनगर पोलिसात फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार जगदाळे करीत आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून घर व दुकान फोडींमुळे नागरिक हैराण असतांना आता चोरट्यांनी गॅरेजकडे मोर्चा वळविला आहे. यापूर्वी देखील याच भागात गॅरेज फोडून हजारोंचे साहित्य लंपास करण्यात आले होते.