गरबा करण्यास मनाई केल्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 11:55 IST2019-10-11T11:54:44+5:302019-10-11T11:55:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  आमलाचा पाटीलपाडा ता़ धडगाव येथे गरबा खेळण्यास मनाई केल्याच्या रागातून जमावाने एका घरावर हल्ला ...

Garba beaten forbidden by Garba | गरबा करण्यास मनाई केल्याने मारहाण

गरबा करण्यास मनाई केल्याने मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  आमलाचा पाटीलपाडा ता़ धडगाव येथे गरबा खेळण्यास मनाई केल्याच्या रागातून जमावाने एका घरावर हल्ला चढवत मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली़ मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत़ 
आमलाचा पाटीलपाडा येथे नवरात्रोत्सवानिमित्त गरबाचे आयोजन करण्यात आले होत़े दरम्यान 7 ऑक्टोबर रोजी रोषमाळ येथील संजय तुकाराम पावरा याच्याससह काही टारगट युवक गरबा खेळण्यासाठी आमलाचा पाटीलपाडा येथे गेले होत़े यावेळी करण आसम पावरा यांनी संजय पावरासह त्याच्या मित्रांना गरबा खेळण्यास मनाई केली होती़ यातून त्याठिकाणी काहीवेळ वादही झाला होता़ घटनेच्या दोन दिवसानंतर बुधवारी सायंकाळी संजय पावरा, संजय देगा पावरा, दिलीप कोटा पावरा, संजय प्रताप पावरा, काल्या रमेश पावरा सर्व रा़ रोषमाळ बुद्रुक ता़ धडगाव यांनी करण पावरा यांच्या आमलाचा पाटीलपाडा येथील घरी जाऊन करण पावरा व त्यांच्या कुटूंबियांना लाठय़ाकाठय़ांच्या सहाय्याने बेदम मारहाण केली़ मारहाणीत करण पावरा व त्यांचा भाऊ असे दोघेही जखमी झाल़े 
याप्रकरणी जयश्री पावरा यांनी धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सर्व आरोपींविरोधात जमावबंदी आदेशांचे उल्लंघन व विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल चेतन साळवे करत आहेत़ 
 

Web Title: Garba beaten forbidden by Garba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.