गंगापूर शिवारात भरदिवसा घरफोडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:18 IST2019-05-19T12:18:31+5:302019-05-19T12:18:54+5:30

दुपारची घटना 2 लाख 35 हजारांचा ऐवज लंपास

Gangadhar Shivaraya Swabhadee Gharghadi | गंगापूर शिवारात भरदिवसा घरफोडी 

गंगापूर शिवारात भरदिवसा घरफोडी 

विसरवाडी : भरदुपारी बंद घर फोडून 2 लाख रुपये रोख व एक सोन्याची चेन असा 2 लाख 35 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटय़ांनी लांबवल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गंगापूर शिवार ता़ नवापूर येथे घडली़ याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
विसरवाडीनजीक गंगापूर शिवारात आयुश विनोद जयस्वाल  हे नुकतेच बांधकाम झालेल्या घरात कुटुंबियांसोबत राहत आहेत़ विनोदभाई जयस्वाल हे त्यांची आई मनीषा जयस्वाल त्यांच्यासोबत गुरुवारी 3:30 वाजेच्या सुमारास राहत्या घराला कुलूप लावून विसरवाडी येथील त्यांचे मामा अविनाश जयस्वाल यांच्या घरी आले. नंतर विसरवाडी येथून 4 वाजता गंगापूर येथील त्यांच्या राहत्या घरी परत गेल्यावर घराचे कडी-कोयंडा व कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले घरात प्रवेश केल्यावर घराचे लोखंडी कपाटाचे दरवाजा व तिजोरी तोडून कोणीतरी अज्ञात चोरटय़ांनी कपाटातील दोन लाख रुपये रोख, तीस हजार रुपये किमतीचे 15 ग्रॅम सोन्याची चैन, तीन हजार रुपये किमतीचे दहा तोळे वजनाचे दोन जोडी चांदीचे कळे, सहाशे रुपये किमतीची नाकातील नथ व अठराशे रुपये किमतीचे घडय़ाळ असे 2 लाख 35 हजार 400 रुपये किमतीच्या ऐवज चोरटय़ांनी चोरून नेला. 
पोलिस सूत्रांनुसार आयुष चोरीच्या घटनेच्या माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील हे हवालदार राजेश येवले, प्रकाश गावीत, तुषार सोनवणे, भगवान कुटे या पथकासह घटनास्थळी पोहोचले तसेच यावेळी ठसे तज्ञ बोलावण्यात आले होते त्यांनी घरातील ठसेचे नमुने घेतल़े जयस्वाल यांनी गंगापूर शिवारात नुकतेच नवीन घर घेतले होत़े या ठिकाणी केवळ एक पेट्रोलपंप वगळता इतर परिसर निर्मणुष्य आह़े  दरम्यान, जयस्वाल कुटुंबात नुकताच लगAसोहळा पार पडला असल्याने ज्याचे त्याचे पैसे देण्यासाठी घरात दोन लाख रुपये रोख ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली़  दरम्यान, आयुश विनोद जयस्वाल यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील करीत आहेत़ 
 

Web Title: Gangadhar Shivaraya Swabhadee Gharghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.