गेंदा येथे शेतीच्या वाटणीतून बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 12:32 IST2019-05-04T12:32:13+5:302019-05-04T12:32:20+5:30
एकावर धाऱ्याने वार : धडगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

गेंदा येथे शेतीच्या वाटणीतून बेदम मारहाण
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील गेंदाचा पाटीलपाडा येथे शेतीच्या हिस्से वाटणीवरुन एकास मारहाण करण्यात आली़ ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा प्रकार घडला़
गेंदाचा पाटीलपाडा येथील हुणºया गणश्या पावरा या युवकाने गावपंचांकडे शेतीच्या वाटे हिश्यबाबत तक्रार केली होती़ याचा राग आल्याने रामदास बामश्या पावरा, विरसिंग डेमश्या पावरा, बामश्या धर्मा पावरा, डेमश्या धर्मा पावरा सर्व रा़ गेंदाचा पाटील पाटीलपाडा यांनी हुणºया पावरा यास बेदम मारहाण केली होती़ या दरम्यान हुणºया पावरा याची आई पिंजारीबाई हीच्यावर रामदास पावरा हा धाºयाने वार करत असल्याने तो वाचवण्याच्या प्रयत्नात हुणºया पावरा याचा अंगठा आणि बोटावर दुखापत झाली़ यावेळी चारही संशयित आरोपींनी हुणºया पावरासह त्याच्या आईस बेदम मारहाण करुन शिवीगाळ केली होती़
याबाबत धडगाव पोलीस ठाण्यात हुणºया पावरा याच्या फिर्यादीवरुन चारही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक साळवे करत आहेत़ याप्रकरणी १ मे रोजी बोमश्या धर्मा पावरा याने दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़