कोरोना चाचणीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST2021-05-10T04:30:19+5:302021-05-10T04:30:19+5:30
धडगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेला शहरातील लाॅकडाऊन १५ मे रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील ...

कोरोना चाचणीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
धडगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेला शहरातील लाॅकडाऊन १५ मे रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यासाठी शहरात केंद्र तयार करुन स्वॅब नमुने संकलित करण्यात आले. यावेळी व्यापाऱ्यांनी एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाला होता.
धडगाव शहरात स्थानिक प्रशासनाकडून १ मेपासून लॉकडाऊनचे पालन केले जात आहे. १५ मे रोजी त्याचा कालावधी संपणार आहे. यातून पुन्हा कोरोनाचा उद्रेक तालुक्यात होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने नगर पंचायतींतर्गत शहरातील सर्व व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. या अनुषंगाने शहरात रविवारी १७९ व्यापाऱ्यांनी स्वॅब नमुने दिले आहेत. यावेळी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिनेश वळवी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संतोष परमार, आदी उपस्थित होते. दरम्यान, तालुक्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाही व्यापारी तथा किरकोळ विक्रेते यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करताच गर्दी केल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. या स्वॅबचे अहवाल २४ तासात प्राप्त झाल्यानंतर प्रशासन पुढील सूचना करणार असल्याची माहिती देण्यात आली.