नंदुरबार : विरचक धरणात बुडून मृत्यू झालेल्या चौघा बालकांवर बुधवारी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी चारही बालकांची अंत्ययात्रा निघाल्यावरचे दृष्य हृदय पिळवटून टाकणारे होते. नंदुरबारातील काळी मशीद परिसरातील इसामूनगर परिसरातील काही बालकं ईदनिमित्त फिरण्यासाठी विरचक धरण परिसरात गेली होती. तेथे आंघोळ करतांना नूरमोहम्मद अब्दुल हमीद (15), सना मोहम्मद मोहमद रिजवान मन्सुरी (15), हुनेर खलील पटवा (15), शेख रेहान शेख साबीर (15) यांचा मृत्यू झाला होता. या बालकांचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सर्व बालके एकाच परिसरातील असल्यामुळे रात्री उशीरा चौघांची अंत्ययात्रा काढण्यात आली. मुस्लिम समाजाच्या स्मशानभुमीत या बालकांचा दफनविधी करण्यात आला. एकाच वेळी चौघांची अंत्ययात्रा काढण्यात आल्यावर उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार लोकमत न्यूज नेटवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:43 IST