शिव स्मारकासाठी निधी संकलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:37+5:302021-08-23T04:32:37+5:30
शहरातील खरेदी-विक्री संघासमोर नियोजित ट्रक टर्मिनलला लागून असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती ...

शिव स्मारकासाठी निधी संकलन सुरू
शहरातील खरेदी-विक्री संघासमोर नियोजित ट्रक टर्मिनलला लागून असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील, पालिका गटनेते प्रा. मकरंद पाटील, माजी नगराध्यक्ष विजय दामू पाटील, नगरसेवक संदीप पाटील, नाना निकुंबे, आनंदा पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, राकेश पाटील, राजेंद्र अग्रवाल, ॲड. सरजू चव्हाण, गणेश पाटील, विष्णू जोंधळे, शरद पाटील, भूषण पाटील, संजय चौधरी, यशवंत चौधरी, आर. आर. बोरसे, चतुर्भुज शिंदे, मनोहर सैंदाणे, शिवस्मारक समितीचे सदस्य व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
शहादा-दोंडाईचा रस्त्यावर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा व स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहादा नगरपालिकेतर्फे ५३ लाख रुपये खर्चाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे तर अश्वारूढ पुतळ्यासाठी ५० लाख रुपये खर्च येणार आहे. हा सर्व खर्च शिवप्रेमी नागरिकांकडून निधी संकलन करून करण्यात येत आहे.
यावेळी अभिजित पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा व शिवस्मारकाच्या कामामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. हे काम शिवप्रेमी नागरिक व पालिकेच्या सहकार्याने पूर्णत्वास येत आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत शहरात पुतळा येणार आहे. तत्पूर्वी या पुतळ्यासाठी लागणारा निधी संकलन करण्यासाठी शहरात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून याठिकाणी शिवप्रेमी नागरिकांनी निधी जमा करण्याचे आवाहन अभिजित पाटील व प्रा. मकरंद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अनिल भामरे यांनी केले.