नंदुरबार जिल्ह्यातील 23 देवस्थानांना निधीद्वारे ‘चकाकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:09 PM2018-07-04T12:09:05+5:302018-07-04T12:09:21+5:30

Funding for 23 places in Nandurbar district 'Dazzle' | नंदुरबार जिल्ह्यातील 23 देवस्थानांना निधीद्वारे ‘चकाकी’

नंदुरबार जिल्ह्यातील 23 देवस्थानांना निधीद्वारे ‘चकाकी’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातील 22 क वर्ग आणि एक ब वर्ग अशा 23 देवस्थानांना 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आह़े यातून या तीर्थस्थळांचे रूप पालटणार असून भाविकांच्या सुविधेच्या कामांना प्राधान्य देण्यावर भर राहणार आह़े 
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धार्मिक स्थळांचा कायापालट करून भाविकांसाठी सोयी निर्माण करण्याची मागणी सातत्याने जिल्ह्यातून होत होती़ यात ब आणि क दर्जा प्राप्त देवस्थानांवर भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा नियोजन समितीने 2018-19 या वर्षासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्याचे वाटप सुरू केले आह़े यातून ठिकठिकाणी भक्त निवास, पाणी पुरवठा योजना, दुरुस्त्या, सभागृह बांधकाम याची कामे करण्यात येत आहेत़ यातून पर्यटन आणि श्रद्धा या दोन्हींचा मेळ घालून जिल्ह्याचा लौकिक वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आह़े क वर्ग दर्जा मिळावा यासाठी जिल्ह्यातील दोन मंदिरांकडून प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला देण्यात आला आह़े यात हळदाणी व डोकारे ता़ नवापूर येथील देवस्थांनाचा समावेश आह़े चौपाळे ता़ नंदुरबार येथील संत दगा महाराज मंदिरालाही क दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधिन आह़े याठिकाणी क दर्जा मिळाल्यास विविध सोयींची निर्मिती शक्य होणार आह़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागात 9 ठिकाणांना विशेष स्थळांचा दर्जा देण्यात येणार आह़े  पालकमंत्री तथा पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी या प्रस्तावांना मंजुरी दिली आह़े यानुसार तोरणमाळ पर्यटन स्थळाचा विकास करणे, अक्राणी महल किल्ल्याचे जतन करणे, अस्तंबा-माथा असलीपासून अस्तंबार्पयत पाय:या करून, हिराजा डोंगराचा रस्ता विकास, तिनसमाळ  व पौला पर्यटन केंद्र तर भूषा गावाला धार्मिक व पर्यटनस्थळ, नर्मदा नदी किना:यावर पर्यटकांना बोट प्रवास, भादल ते डनेल असा नर्मदा नदीचा प्रवास बोटीने करणे यासाठी निधी प्राप्त होण्याची शक्यता आह़े नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ-शनीमंदिर, मरिमाता मंदिर-निंभेल, महादेव मंदिर- कोपर्ली, काकेश्वर मंदिर-भालेर, मरिमाता मंदिर- होळ तर्फे रनाळे, देवमोगरा माता मंदिर- भांगडा, काठोबा देवस्थान- अक्राळे, काळमदेव मंदिर-इंद्रीहट्टी येथे सुविधांसाठी निधी देण्यात आला आह़े अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथील याहामोगी माता मंदिर, अंबिका माता मंदिर-खापर, रामदेवबाबा मंदिर आमलीफळी खापर, काठी, माँ कालिका मंदिर-सोरापाडा़ धडगाव तालुक्यातील अस्तंबा देवस्थान, तोरणमाळ येथील गोरक्षनाथ मंदिऱ तळोदा तालुक्यातील संत गुलाम महाराज समाधीस्थळ-रंजनपूर (मोरवड), विठ्ठल मंदिर-रांझणी़ नवापूर तालुक्यातील कोठडा येथील महादेव मंदिर या देवस्थानाला क दर्जा प्राप्त असून तेथेही सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत़ 
वर्षाला 1 लाखांपेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती आणि दिवसाला 300 च्या जवळपास भाविकांकडून दिल्या जाणा:या भेटी यातून मंदिरांना दर्जा देण्याची पद्धत आह़े यात पोलीस अधीक्षकांचे प्रमाणपत्र देण्याची अट आह़े 
जिल्ह्यातील जवळजवळ सर्व देवस्थानांना बाहेरगावाहून आलेले पर्यटक भेट देत असल्याने इतर स्थळांचा क दर्जाच्या तीर्थस्थळात समावेश करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े 
सारंगखेडा ता़ शहादा येथील दत्त मंदिराला ब वर्ग दर्जा प्राप्त असून त्यासाठीही जिल्हा नियोजन समितीकडून विविध सोयींसाठी निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े 


 

Web Title: Funding for 23 places in Nandurbar district 'Dazzle'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.