नंदुरबार बाजार समितींचे कामकाज 28 फेब्रुवारीपासून पासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 12:18 IST2019-02-26T12:18:36+5:302019-02-26T12:18:56+5:30
नंदुरबार : बाजार समिती कर्मचा:यांच्या विविध मागण्यांसाठी 28 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे बाजार समितींच्या कामकाजावरही ...

नंदुरबार बाजार समितींचे कामकाज 28 फेब्रुवारीपासून पासून बंद
नंदुरबार : बाजार समिती कर्मचा:यांच्या विविध मागण्यांसाठी 28 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे बाजार समितींच्या कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
बाजार समितींमधील सचिव ते शिपाई पदार्पयतच्या कर्मचा:यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची आहे. परंतु शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या मागणीसाठी 28 फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. त्याच दिवसापासून काम बंद आंदोलन देखील सुरू होणार आहे. या आंदोलनाला सर्व संबधीत खरेदीदार, आडते, हमाल-मापाडी आदी संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समितीमधील सर्व प्रकारचा शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार बंद राहणार असल्याचेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, सर्व बाजार समिती सभापती, जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन दिले आहे.