कोरोनामुळे पिकांची राखणदारी करणाऱ्या शेतकऱ्यांवर दरोडेखोरांच्या टोळीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 13:20 IST2020-03-25T13:19:22+5:302020-03-25T13:20:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत़ यामुळे शेतकºयांनी काढणी केलेली ...

कोरोनामुळे पिकांची राखणदारी करणाऱ्या शेतकऱ्यांवर दरोडेखोरांच्या टोळीचा हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत़ यामुळे शेतकºयांनी काढणी केलेली पिके शेतात असून या पिकांची राखणदारी करणाºया दोघा शेतकºयांसह रखवालदारावर दरोडेखोरांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली़ याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत़
धरमदास मंगल पाटील व रविंद्र तुकाराम पाटील हे दोघे शेतकरी आणि रखवालदार लालसिंग फुल्या वळवी अशी मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत़ कोरोनामुळे बाजार समिती बंद असल्याने औरंगपूर शिवारातील शेतात धरमदास पाटील, रविंद्र पाटील व लालसिंग वळवी हे मुक्कामी होते़ काढणी केलेल्या हरभरा उत्पादनाची तिघेही रखवालदारी करत असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास १० ते १२ जणांच्या टोळक्याने तिघांवर अचानक हल्ला चढवला़ घाबरून या तिघांनी शेतातून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता़ परंतू टोळक्याने तिघांना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली होती़ मारहाणीत धरमदास पाटील हे गंभीर जखमी झाले़ तर रविंद्र पाटील लालसिंग वळवी यांना मार लागला आहे़ चोरट्यांनी तिघांकडून दोन मोबाईल आणि साडेतीन हजार रुपये रोख असा ऐवज लुटून नेला़
दोन मोटारसायकलींची तोडफोड केली़ तिघांनी आरडओरड केल्यानंतर टोळक्याने येथून पळ काढला़ याबाबत धरमदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात १० ते १२ जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनास्थळी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक नजन पाटील व व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने भेट देऊन माहिती घेतली होती़