इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका, ट्रॅक्टरने शेतीची मशागत करणे झाले महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST2021-05-25T04:33:58+5:302021-05-25T04:33:58+5:30

डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांचाही मशागतीचा खर्च वाढला आहे. ट्रॅक्टरमुळे दिवसभरात होणारे काम काही तासातच होते. मात्र डिझेल दरवाढीमुळे उत्पन्न व ...

Fuel price hike hit farmers, tractor farming became expensive | इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका, ट्रॅक्टरने शेतीची मशागत करणे झाले महाग

इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका, ट्रॅक्टरने शेतीची मशागत करणे झाले महाग

डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांचाही मशागतीचा खर्च वाढला आहे. ट्रॅक्टरमुळे दिवसभरात होणारे काम काही तासातच होते. मात्र डिझेल दरवाढीमुळे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे चित्र आहे. सध्या खरीप हंगामापूर्वी मशागतीच्या कामांना वेग आला असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करणे तसेच इतर मशागतीची कामे सुरू आहेत. मशागतीच्या कामांव्यतिरिक्त खते व बियाणे पेरणीसाठीही ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण सतत वाढत असलेल्या इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टर मालकांनीही दर वाढवले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचेही आर्थिक गणित कोलमडले आहे.

इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करणे, रोटोव्हेटर फिरविणे, सरी पाडणे आदी कामांचे दर वाढले आहेत. यामुळे शेतीची कामे करणे अवघड झाले आहे. शेतीचा उत्पादन खर्च, शेतमालाला मिळणारा बाजारभाव व खर्च पाहता शेतमालाला हमीभाव मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने ट्रॅक्टरसाठी वापरले जाणारे डिझेल सवलतीच्या दरात किंवा अनुदान देणे गरजेचे आहे.

-प्रवीण बागूल, शेतकरी, कळंबू, ता.शहादा

Web Title: Fuel price hike hit farmers, tractor farming became expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.